Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

औपचारिक पत्र म्हणजे काय त्याचे प्रकार जाणून घ्या

Letter writing
, मंगळवार, 22 एप्रिल 2025 (19:30 IST)
कार्यालयीन तसेच व्यावसायिक पात्रांचे स्वरूप औपचारिक पत्र असतात.तेव्हा अशा पत्रांना औपचारिक पत्रे म्हणतात. उदाहरणार्थ, शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेली पत्रे इत्यादी, पुस्तक विक्रेत्यांना आणि विविध अधिकाऱ्यांना पाठवलेली पत्रे.काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरुपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार आहे.
औपचारिक पत्र लेखन कसे करावे
औपचारिक पत्र लेखनाची सुरुवात करण्यासाठी पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात स्वतःचे नाव, पत्ता आणि खाली दिनांक लिहा.पत्रातील मजकूर विषयाला धरून लिहावे.
पत्र लेखन करताना भाषा नेहमी साधी आणि औपचारिक असावी. त्यात अनावश्यक गोष्टी लिखाण करणे टाळावे. पत्राच्या खाली उजव्या कोपऱ्यामध्ये प्रति असे लिहून ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे पद आणि पत्ता लिहावा. नंतर विषय आणि संदर्भ लिहून पत्राच्या मजकुराला सुरुवात करावी.
औपचारिक पत्र कधी लिखाण केले जाते.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय स्वरूपाची कामे असल्यास जसे एखाद्या समारंभात आमंत्रण देण्यासाठी, सहकार्याबाबद्दल आभार मानण्यासाठी अशी पत्रे लिहितात. शाळेतून सुट्टी हवी असल्यास मुख्यध्यापकांना तसेच शासकीय तसेच निमशासकीय कामांसंदर्भात जसे की, कमी वीजपुरवठा, वाढीव बिले, रस्त्यांची दुर्व्यवस्था संबंधी तक्रारीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी लिहिलेली पत्र. सामाजिक, खाजगी व्यापारी संस्थाच्या संदर्भात असलेली कामे.जसे की नौकरी शोधताना, गैरसोयींबद्दल तक्रार करताना लिहिलेली पत्र
 
औपचारिक पत्राचे उदाहरण
वैद्यकीय कामाकरिता दोन दिवसांची सुट्टी मिळवण्यासाठी मुख्यध्यापकांना पत्र
 
दि :- 22 एप्रिल 2025
प्रति ,
   मा. मुख्याध्यापक साहेब
   सरस्वती ज्ञान विद्यामंदिर,  
   सातारा. 415001
               
                    विषय :- वैद्यकीय तापासणीकरिता दोन दिवसांची सुट्टी मिळणे बाबत...  
महोदय ,
               मी सुजाता देशपांडे  आपल्याच विद्यालयातील इयत्ता ८ वी च्या वर्गात शिकत आहे. तरीही माझी तब्येत ठीक नसून मला अस्वस्थ वाटत असल्याने वैद्यकीय तपासणीसाठी जायचे आहे. तरी मला या महिन्यात २५ एप्रिल ते २६ एप्रिल हे दोन दिवस सुट्टी मिळावी. अशी विनंती करते.  
             आपल्या शाळेतील एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून मला सुट्टी द्याल, अशी मी अपेक्षा करते.  
     
  आपली विश्वासू
कु. सुजाता देशपांडे 
सरस्वती ज्ञान विद्यामंदिर  
{८ वी ची विदयार्थींनी }
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Blouse Sleeves Design ब्लाउजच्या या ४ स्लीव्स डिझाईन्समुळे तुम्ही खास दिसाल