Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे साजरा केला आणि संगीताचे महत्व काय आहे?

Webdunia
रविवार, 20 जून 2021 (17:48 IST)
दर वर्षी 21 जून रोजी संगीत दिवस साजरा केला जातो.याला फेटे डी ला म्युझिक असे ही म्हणतात.याचा अर्थ आहे संगीत महोत्सव.
फ्रान्समध्ये 1982 पासून हा दिवस साजरा करण्याची सुरूवात झाली होती. यानंतर, दरवर्षी सुमारे 17 देशांमध्ये जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. या मध्ये भारत देशाचा देखील समावेश आहे.
 
संगीत दिन साजरा करण्याचा उपक्रम 1976 मध्ये माजी अमेरिकन जोएल कोहेन यांनी सुरू केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, लक्झेंबर्ग,जर्मनी, इस्त्राईल,चीन,पाकिस्तान,मोरोक्को,स्वित्झर्लंड, कोस्टारिका,लेबेनॉन, मलेशिया, रोमानिया, कोलंबिया आणि फिलिपाईन्स आहे.वेग वेगळ्या देशात हा दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.कुठे संगीताची मैफिल असते तर कुठे ईडीएम नाईट,तर कुठे संगीत स्पर्धा आयोजित करण्यात येते.
 
भारतातील हे शहर संगीताचे शहर आहे- 
 
उत्तर प्रदेशात स्थित वाराणसीची स्वतःची एक कथा आहे. ज्याला धर्म आणि संगीताची भूमी असे म्हणतात. युनेस्कोने भारताच्या वाराणसीच्या भूमीला 'संगीताचा शहर ' म्हणून घोषित केले.आहे.या शहरातून अनेक तारकांनी जन्म घेतला आहे ज्यांनी संगीताला एक नवीन ओळख दिली आहे.पंडित,रविशंकर,शहनाई तज्ज्ञ बिस्मिल्ला खान,गिरीजा देवी,यांच्या सह अनेक संगीतकाराचा जन्म इथे झाला आहे.
 
संगीत आणि जीवन
 
संगीत आणि जीवन हे दोन्ही भिन्न आहेत परंतु एकमेकांना पूर्ण करतात .बर्‍याचदा जेव्हा आपल्या मनात काय असते हे कोणालाही समजत नाही, तेव्हा आपल्याला  त्याचे सार संगीतात मिळते. आणि जेव्हा संगीतामध्ये ते सार नसते तेव्हा एखादी व्यक्ती ती गोष्ट संगीतातून सांगून जाते.इंग्रजीत एक म्हण आहे की ‘माय प्ले लिस्ट अंडरस्टेंड मी बेटर देन अदर्स’म्हणजे माझी प्लेलिस्ट मला इतरांपेक्षा जास्त चांगलं ओळखते.
संगीत एक भावना आहे एक अनुभव आहे,ज्याला ऐकून प्रत्येकजण आनंदित होतो.बऱ्याचदा लोकांना एकाकीपणा अस्वस्थता जाणवत असल्यास ते एकटे बसून संगीत ऐकणे पसंत करतात.संगीत ऐकून त्यांना हलकं वाटतं.
 
आजच्या काळात, व्यक्तीच्या मनःस्थितीनुसार संगीताच्या अनेक झोनर आहे ज्यांना चालवून माणसाला त्याचे मूड कसे आहे लक्षात येत.संगीत आणि आरोग्याचे जवळचे संबंध आहे.माणूस जेव्हा संगीत ऐकतो तेव्हा त्याच्या शरीरात संवेदनशील लहरी वाहतात.मन हलकं होऊन आंनद होऊ लागतो.बऱ्याच वेळा तर काही काही गाणी किंवा संगीत ऐकल्यावर डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
 
मानसशास्त्रज्ञांच्या मते,संगीत आणि आरोग्याचे खोल संबंध आहे.वैज्ञानिक क्षेत्रात संगीत आणि आरोग्यावर संशोधन सुरु आहे.प्राचीन काळापासून संगीत आणि आरोग्याला महत्त्व आहे.आरोग्यावर त्याचा होणारा परिणाम बघितल्यावर त्याला संगीत थेरेपी असे म्हणतात.
 
आजच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात,तणाव आणि सगळी कडे होणाऱ्या आवाजामुळे मन अस्वस्थ होते.त्या मनाला शांत करण्यासाठी व्यक्ती संगीत ऐकणे पसंत करत.मग ते स्लो म्युझिक असो,गझल असो,किंवा शास्त्रीय संगीत असो.म्हणून संगीताला म्युझिक थेरेपी देखील म्हणतात. 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

काजू चिकन फ्राइड राइस रेसिपी

Mother's Day 2025 Gift Ideas मदर्स डे निमित्त आईला देण्यासाठी स्वत:च्या हाताने तयार करा या भेटवस्तू

Coconut Buttermilk उन्हाळ्यात पटकन तयार करा चविष्ट नारळ ताक

नाश्त्यात बनवा ब्रेड उपमा रेसिपी

या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहे, या करणे टाळावे

पुढील लेख
Show comments