rashifal-2026

अशुभ सूर्य नोकरीस घातक

वेबदुनिया
जन्मपत्रिकेत असलेला 10 वा भाव सगळ्यात महत्त्वाचा असतो. यावरच आपले कर्म क्षेत्र, वडील, व्यापार, उच्च नोकरी, राजकारण, उच्चपद या गोष्टी अवलंबून असतात. जन्मपत्रिकेतील 10 भाव अशुभ असेल तर आयुष्य सरतं परंतु आपल्या जीवनाची गाडी रुळावर येत नाही.  
 
सूर्य अशुभ असेल तर आपल्याला वडिलधार्‍यांचा आधार मिळत नाही. राजकारणात नेहम‍ी अपयश मिळते. व्यापार अथवा नोकरीत कधी न सुटणार्‍या अडचणी निर्माण होतात. कुंडलीत जर सूर्य व शनि सोबत असतील तर त्या घरात वडील व मुलगा यांच्यात नेहमी खटके उडत असतात. सूर्यासोबत राहू आल्यास पितृदोष असून तो प्रत्येक शुभकार्यात अडचणी निर्माण करणारा असतो.
 
सूर्य- चंद्राची स्थिती अमावस्या योग असल्याने जातकाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शनीची सूर्यावर वक्रदृष्टी असते. श्रेष्ठ सूर्य प्रत्येक क्षेत्रात फळ देणारा असतो. 
 
सूर्यासोबत जर गुरू आला असेल तर तो फायदेशीर ठरतो. राजकारणी लोकांना त्याचा भरपूर फायदा होत असतो. नोकरीतही इच्छेनुसार पद मिळत असते. नेहमी वडीलधार्‍या मंडळींचे पाठबळ मिळत असते. सूर्य- मंगळ असलेल्यांना पोलिस प्रशासनात नोकरीचे योग असतात. सूर्य जर बुध सोबत आला असेल तर त्याचे फळ नेहमीच चांगले मिळते. असा जातक विद्वान, उच्च प्रशासकीय अधिकारीही असू शकतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

वाईट दशाचा अंत: सुख आणि समृद्धी मिळविण्यासाठी दशामातेचे व्रत करा, उपासनेची पद्धत जाणून घ्या

Guruvar Vrat Katha: गुरुवारी ही व्रत कथा नक्की वाचा, कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही

आरती गुरुवारची

सकाळी उठल्यावर म्हणावेत असे ५ शक्तिशाली संस्कृत मंत्र

Dasha Mata Vrat 2026 दशा माता व्रत कधी आणि का पाळले जाते? महत्त्व, पूजा पद्धत आणि कथा जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments