यश आणि अपयश हे मानवी जीवनाचे दोन महत्त्वाचे घटक आहे. माणूस यश मिळवण्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करत असतो. पण बऱ्याच वेळा खूप प्रयत्न केल्यावर देखील त्याला अपयशाला सामोरी जावं लागत. अश्या परिस्थितीत तो नैराश्याचा वेढ्यात अडकतो. जर का आपण देखील यश प्राप्तीसाठी फार कष्ट करत असाल आणि तरीही आपणांस त्यानुरूप परिणाम मिळत नसेल तर आपणांस अस्वस्थ होण्याची काहीही गरज नाही. आम्ही आपणास काही उपाय सांगत आहोत ज्याचा अवलंब करून आपण आपली स्वतःची मदत करू शकता.
1 ज्योतिषाचार्यानुसार, कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी घरातून निघताना एक पोळी घेऊन निघा. वाटेत जिथे आपल्याला कावळा दिसलास, त्याला पोळी घालून पुढे वाढा. असे म्हणतात की असे केल्यानं यश मिळतं.
2 असे म्हणतात की कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असताना एक लिंबू घेऊन त्यामध्ये 4 लवंगा लावून द्या. या नंतर हनुमानाचे 21 वेळा नाव घेऊन त्या लिंबाला आपल्या जवळ बाळगा. असा विश्वास आहे की असे केल्यानं आपल्या वर येणारे सर्व अडथळे दूर होतात.
3 असे म्हणतात की कोणतेही शुभ कामासाठी निघताना गोड खाणं चांगलं असत. असे म्हणतात की याच सह गणपतीचे नाव घेऊन घरातून निघावे जेणे करून सगळी कामे सुरळीत होतात.
4 ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते कोणते ही शुभ कार्यासाठी निघणाच्या पूर्वी घराच्या मुख्यदारावर काळे मिरे पसरवून द्या. त्यावर पाय ठेवून निघून जा आणि परत मागे वळून बघू नका. असे केल्याने कोणत्याही कार्यात अडथळे येत नाही.
5 अशी आख्यायिका आहे की घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुळशीचे पान खाणे शुभ असतं. असे केल्याने कामात यश मिळते.
* टीप - या लेखामध्ये दिलेल्या माहितीवर आम्ही दावा करत नाही की या पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे आणि त्याचा अवलंब केल्याने अपेक्षित निकाल मिळेल. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.