24 जानेवारी 2020 रोजी, शनी महाराज धनू राशीतून मकर राशीमध्ये आले. तेव्हा पासून 10 मे 2020 पर्यंत ते मार्गी गतीने चालत आहे.
11 मे, 2020 रोजी शनी आपली मार्गी गती सोडून वक्री झाले आहे आणि आता ते तब्बल 142 दिवस म्हणजेच 29 सप्टेंबर पर्यंत या अवस्थेतच राहणार आहेत. नंतर ते पुन्हा मार्गी होतील.
शनी वक्री झाल्यानंतर 13 मे रोजी शुक्र देखील वृष राशीमध्ये वक्री होणार. 14 मे रोजी शुभ ग्रह गुरु देखील वक्री होतील. काही दिवसानंतर बुध ग्रह पण वक्री होतील, आणि राहू केतू तर नेहमीच वक्री असतात. अश्या प्रकारे 9 पैकी 6 ग्रह वक्री अवस्थेत राहतील. या 6 ग्रहांचे एकाचवेळी वक्री होणे एक दुर्मिळ योगायोग आहे.
शनीची ही बदलणारी गती सर्वसाधारण माणसाला ताण तणाव वाढवणारी असणार. शनी साधारणपणे एका राशीमध्ये जवळ जवळ अडीच वर्षे वास्तव्यास असतं. अश्या प्रकारे शनीला 12 राशींमध्ये चक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षे लागतात.
शनी वक्री झाल्यावर सर्वात जास्त अशुभ प्रभाव साडेसाती किंवा ढैय्या सुरू असलेल्या राशींवर पडतो. आपल्या जन्मपत्रिकेत शनी अशुभ घरात असल्यास आपल्यावर घोर संकटे येऊ शकतात आणि शनी शुभ घरात असल्यास कोणीही आपले काहीही वाईट करू शकणार नाही.
ज्योतिषीय गणितानुसार शनी वक्री असल्यास फार दुःख मिळतात आणि ज्या राशींवर शनीची दृष्टी पडते त्यांना खूप संकटांना झुंज द्यावी लागते. सध्याच्या काळात धनू, मकर आणि कुंभ या राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. मिथुन आणि तूळ राशी शनीच्या अडीच वर्षांच्या प्रभावाखाली आहे.
शनी वक्री असल्यामुळे या 5 राशींवर सर्वात जास्त परिणाम दिसून येतील. इतर 7 राशींच्या लोकांना घाबरण्याची गरज नाही.
वैश्विक महामारी कोरोनाचा दुष्प्रभाव सुद्धा या राशींच्या लोकांवर सर्वात जास्त होण्याची शक्यता आहे. यामुळे सप्टेंबर- ऑक्टोबर 2020 पर्यंत इतकी हानी देखील होऊ शकते ज्यातून बाहेर पडण्यासाठी किमान 12 ते 18 महिने लागू शकतात.
जर आपण या काळात नेहमीच शुभ कार्ये केले तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही.