गुरुवार हा आपल्या गुरुचा वार. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी बृहस्पती ग्रहची पूजा केली जाते. गुरु हा विवाहकारक ग्रह मानला जातो. आपल्या जीवनात तसेच कुंडलीत गुरूचे स्थान महत्त्वाचे आहे. जर कुंडलीतील गुरु अशुभ स्थानात असेल तर व्यक्तिला विवाह संदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासोबत धार्मिक कार्यांत देखील अनेक विघ्न येतात. बृहस्पती ग्रहाच्या अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी गुरुवारी आपल्या राशीनुसार हे उपाय करावेत...
मेष- या राशीच्या लोकांनी बजंग बाणचे पाठ करावेत.
वृषभ- या राशीच्या लोकांनी शिवलिंगाचा जलने अभिषेक करावा.
मिथुन- या राशीच्या लोकांनी गाईला चारा खाऊ घातल्याने आपल्या वैवाहिक जीवन सुखी होऊन जाईल.
कर्क- या राशीच्या लोकांनी शिवशंकराचा दूधाने अभिषेक करावा.
सिंह- या राशीच्या लोकांनी लाल वस्त्र परिधान करावे.
कन्या- या राशीच्या लोकांनी बजरंग बाणचा पाठ करावेत.
तूळ- या राशीच्या लोकांनी शिवशंकराचा जलाने अभिषेक करावा.
वृश्चिक- या राशीच्या लोकांनी इलायची मिश्रित दूध सेवन करावे.
धनु- या राशीच्या लोकांनी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा.
मकर- या राशीच्या लोकांनी श्रीगणेश पूजन करूनच शुभ कार्याला प्रारंभ करावा.
कुंभ- या राशीच्या लोकांनी श्रीकृष्ण मंत्राचा जप केल्याने शुभ कार्यातील अडचणी दूर होतील.
मीन- या राशीच्या लोकांनी माता पार्वती आणि शिव शंकराचे का दर्शन करावे. दाम्पत्यामधील प्रेम बहरेल.