Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Swapna Phal हे 5 स्वप्न धन प्राप्तीचे संकेत देतात

Swapna Phal हे 5 स्वप्न धन प्राप्तीचे संकेत देतात
, बुधवार, 9 डिसेंबर 2020 (09:59 IST)
स्वप्न विज्ञानानुसार प्रत्येक स्वप्नाचे काही न काही अर्थ असतात. हे स्वप्न आपल्या वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळातील,घटनांकडे लक्ष वेधतात. काही स्वप्न शुभ घटना घडण्याचे सांगतात तर काही स्वप्न अशुभ घटनांना दर्शवितात. कधी कधी आपण असे स्वप्न देखील बघतो जी आपल्याला भविष्यात धन प्राप्ती होण्याचे संकेत देखील देतात. चला तर मग जाणून घेऊ या की अशी कोणती स्वप्न आहेत ज्यांचा संबंध आपल्याला होणाऱ्या धनप्राप्तीशी असतो.
 
1 स्वप्नात गाय दिसल्यास - 
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात गाय बघणे खूप शुभ असत. वेग-वेगळ्या गायींना बघणे शुभ असत. जर आपण स्वप्नात गायीला दूध देताना बघितल्यावर आपल्या घरात सुख आणि समृद्धी येणार असं समजावं. जर पण स्वप्नात एखादी चित्तकबरी गाय बघितल्यावर व्याज व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे दर्शवतात. 

2 स्वप्नात नाचताना मुलगी दिसल्यास -
वास्तविक जीवनात एखाद्या मुलीच्या नृत्याला बघणे हे मनोरंजनात्मक असू शकत. पण आपण आपल्या स्वप्नात एखाद्या मुलीला नृत्य करताना बघितल्यावर हे आपल्यासाठी फायदेशीर असू शकत. ह्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळात आपल्याला पैसे मिळू शकतात. हे स्वप्न शुभ असत.
 
3 स्वप्नात देव दिसल्या वर -
स्वप्न शास्त्रानुसार, जर आपल्याला स्वप्नात देवाचे दर्शन घडल्यास हे स्वप्न शुभ असत. ह्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की आपल्या वर देवाची कृपा होणार आहे, ज्या मुळे आपल्याला येणाऱ्या काळात आनंद, सुख समृद्धी भरपूर मिळेल. 
 
4 स्वप्नात तेवता दिवा बघणं -
स्वप्नात तेवत असलेला दिवा बघणं  खूप शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्राच्यानुसार जर आपण स्वप्नात तेवत असलेला दिवा बघितला  तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला येणाऱ्या काळात भरपूर धनलाभ होईल आणि हे स्वप्न आपल्या जीवनात आर्थिक भरभराटी घेऊन येईल. 
 
5 स्वप्नात मासे बघणे -
शास्त्रात मासे हे देवी आई लक्ष्मीच्या आगमनाचे सूचक मानले जाते. स्वप्न शास्त्राच्यानुसार जर आपल्याला स्वप्नात मासोळी दिसली तर समजावं की आपल्यावर लवकरच आई लक्ष्मीची कृपा दृष्टी होणार असून घन लाभ होईल. तसेच जर आपण स्वप्नात एखाद्या झाडावर चढत असाल तरी देखील आपल्याला अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सूर्य ग्रहण 2020 : सोमवती अमावास्येला सूर्यग्रहण, काय करावे- काय नाही