Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पैशांनी घर भरावं यासाठी प्रभू श्रीकृष्णाने सुचवलेले काही उपाय

पैशांनी घर भरावं यासाठी प्रभू श्रीकृष्णाने सुचवलेले काही उपाय
प्रभू विष्णूंनी अनेक अवतार घेतले ज्याने पृथ्वीवर धर्म कायम राखून ते मानवाची मदत व्हावी. यातून एक श्री कृष्णा अवतार. कृष्णाने असंख्य लोकांना प्रभावित केले. त्रेता युगात प्रभू श्री कृष्णाचे जीवन अनुभव आणि उदाहरणं यांनी परिपूर्ण राहिले आणि वेळोवेळी भक्तांची रक्षा करण्यासाठी ते पुढे होते. प्रेरणा स्रोत कृष्णाचे उपदेश साधू संतांनी लिखित रूपात जपून ठेवले आणि त्याचे साक्ष वर्तमानात देखील उपस्थित आहे. गरजू लोकांसाठी हे उपदेश मार्गदर्शक आहेत. अशात लेखांमधून पाच उपाय आम्ही आपल्याला सांगत आहोत ज्यामुळे घरातून गरिबी दूर केली जाऊ शकते. 
 
तुपाचा दिवा
प्राचीन काळात आपल्या कुटुंबाच्या कूळ देवी किंवा देवतांसमोर दिवा लावण्याची परंपरा आहे. काही लोकं सकाळी तर काही संध्याकाळी दिवा लावतात. तरी हिंदू धर्मानुसार व्यक्तीने सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा तुपाचा दिवा लावायला हवा याने घरातून निर्धनता दूर होते.
 
पाणी पाजणे 
आमच्याकडे पाहुण्यांना देवस्वरूप मानले गेले आहे. त्यांचं यथाशक्ती आतिथ्य करणे आपल्या देशातील परंपरा आहे. तसेच आपल्या घरी कोणीही आल्यावर सर्वात आधी त्याला पिण्यासाठी पाणी द्यायला हवं. तहान भागवल्याने मिळणारी दुआ अत्यंत प्रभावी असते. म्हणून घरी आलेल्या पाहुण्या पाणी पाजावे. तसेच हे ही लक्षात असू द्या की ग्रह नक्षत्रांची स्थिती अशुभ असेल तर याचा फायदा होणार नाही तरी कर्म करत राहावे.
 
मध
आम्हाला घरात मध ठेवले पाहिजे. मध प्रभू विष्णूंशी संबंधित आहे. मध घरातील स्वच्छ जागेवर ठेवावे. मधामुळे पूर्ण घरात सकारात्मकता राहते.
 
पवित्र तिलक
तिलक लावल्याने मेंदू शांत आणि स्थिर राहतं. ज्योतिष शास्त्राप्रमाणे व्यक्तीला आपल्या राशी आणि कुंडलीप्रमाणे शेंदूर, चंदन व इतर या प्रकारे तिलक करावे. याने नक्की प्रभाव पडेल आणि घरातून गरिबी दूर होण्यात मदत मिळेल.
 
देवी सरस्वतीची वीणा
सामान्यात वीणा घरात सजावटी ठेवण्यात येते परंतू खूप कमी लोकांना माहीत असेल की वीणा ठेवल्याने कोणत्याही कामात यश मिळण्यात मदत होते. आर्थिक असो वा नसो सर्व काम केवळ वीणामुळे यशस्वी पार पडतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल गांधी पंतप्रधान बनू शकतात का? जाणून घ्या त्यांचे ग्रह नक्षत्र