suvichar

कार्पोरेट जगत आणि ज्योतिषशास्त्रात असणारा संबंध

Webdunia
सोमवार, 14 जानेवारी 2019 (11:41 IST)
व्यक्तीचे व्यावसायिक यश त्याचे कर्तृत्व आणि मेहनतीवर अवलंबून असले तरीसुद्धा तुमची जन्मतिथी आणि ऋतू हे घटक देखील तुमचे करिअर निर्धारित करण्यात अत्यंत महत्वाचे असतात. सौडर स्कूल ऑफ बिझीनेस आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया या विद्यापीठाच्या संशोधकांनी एका सर्वेक्षणाअंती हा निष्कर्ष काढला आहे. उन्हाळ्यात जन्मणारी मुले कार्पोरेट क्षेत्रात फारशी यशस्वी होत नाहीत. त्यामुळे अशा मुलाकडून सीईओ होण्याची अपेक्षा करणे अयोग्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. 500 पेक्षाही अधिक सीईओंचा अभ्यास केल्यानंतर ही बाब संशोधकांच्या ध्यानात आली. 
 
जन्मतिथी आणि ऋतू यांचा मुलांच्या बुद्धिमत्तेवर देखील आमूलाग्र परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे, पण याचबरोबर प्रचलित शिक्षणपद्धतीचा मुलांच्या व्यावसायिक यशावर अधिक परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले. जून आणि जुलैमध्ये जन्मलेली मुले त्यांच्या शालेय जीवनामध्ये अधिक तरुण तर मार्च आणि एप्रिलमध्ये जन्मलेले तुलनेने अधिक प्रौढ आढळून आले आहेत. या नव्या संशोधनामुळे कार्पोरेट जगत आणि ज्योतिषशास्त्र यांचा संबंध स्पष्ट झाल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत, पण अनेकांनी मात्र या संशोधनावर विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

Vasudeva Chaturthi 2026 वासुदेव चतुर्थी व्रत तिथी, मंत्र, शुभ मुहूर्त आणि संपूर्ण पूजा-विधी

Lakshmi Panchami 2026 चैत्र नवरात्री लक्ष्मी पंचमी पूजन पद्धत आणि कथा

Adhik Maas 2026: यंदा कोणता महिना अधिक आहे? पुरुषोत्तम मास कधीपासून सुरू होतोय? सर्व काही सविस्तर जाणून घ्या

Matsya Jayanti 2026 मत्स्य जयंती 21 मार्च रोजी, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

पुढील लेख
Show comments