Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाल किताबानुसार 5 उपाय केल्याने कर्जमुक्त व्हाल

Astrological Remedies For Debt Removal
, सोमवार, 11 जानेवारी 2021 (10:33 IST)
लाल किताब मध्ये असे काही उपाय आहे जे आपल्याला कर्जाच्या संकटापासून धनप्राप्तीचे मार्ग उघडतात. अट अशी आहे की या किताबानुसार कर्माने शुद्ध असावे. कारण या किताबामध्ये त्यांच्या उपायापेक्षा अधिक प्रभावी त्याची खबरदारी आहे. या किताबामध्ये कर्ज संकटापासून मुक्त होऊन धनप्राप्तीचे काही सामान्य परंतु  अचूक उपाय सांगितले आहे. 
 
1 कुलूप नशीब उघडेल - 
कोणत्याही शुक्रवारी कुलूप खरेदी करण्यासाठी दुकानावर जाऊन स्टीलचा किंवा लोखंडी कुलूप विकत घ्या पण लक्षात ठेवा की कुलूप बंद असावे उघडे नाही. त्या कुलुपाला स्वतः देखील उघडू नका आणि त्या दुकानदाराला देखील उघडू देऊ नये. आणि या बंद कुलुपाला शुक्रवारीच आपल्या शयनकक्षात पलंगाजवळ ठेवून झोपा आणि सकाळी उठल्यावर अंघोळ करून कुलूप न उघडता एकाद्या देऊळात किंवा धार्मिक स्थळी ठेवून द्या. कुलूप ठेवल्यावर कोणाशी ही न बोलता,पालटून न बघता आपल्या घरी या. कोणीही ते कुलूप उघडल्यावर आपले नशीब देखील उघडेल. आणि त्याचे देखील नशीब उघडेल. 
 
2 ग्रहांचा उपचार-  
आपले एखादे ग्रह खालचे आहेत किंवा खराब आहे तर खालील उपाय अवलंबवा. 
* सूर्य -वाहत्या पाण्यात गूळ, तांबा किंवा तांब्याचे नाणे, वाहून द्या. 
* चंद्र- दूध किंवा पाण्याने भरलेले भांडे उशाशी ठेवून झोपा आणि सकाळी हे दुसऱ्या दिवशी सर्वपाणी बाभळाच्या मुळात घाला.
* मंगळ- पांढरा सुरमा डोळ्यामध्ये लावा, वाहत्या पाण्यात रेवडी, बत्ताशे, मध आणि शेंदूर वाहून द्या. 
* बुध- कुमारिकांना हिरवे कपडे आणि हिरव्या बांगड्या दान द्यावा, दात स्वच्छ करावे.
* गुरु- कपाळी केशर किंवा चंदनाचा टिळा लावा, पिंपळाच्या मुळात पाणी घाला, हरभऱ्याची डाळ दान करा. 
* शुक्र- ज्वारी, चारी, तूप, कापूर, दह्याचा दान करा. सुवासिक पदार्थांचा वापर करा. 
* शनी - बाभळ्याने दातून करा, झाडाच्या मुळात तेल घाला.
* राहू - बार्ली ला दुधाने धुऊन वाहत्या पाण्यात सोडा, मुळा दान करा, कोळसा वाहत्या पाण्यात सोडा, खिशात चांदीची गोळी ठेवा. 
* केतू -काळे आणि पांढरे तीळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.
 
3 अन्न दान- रात्री झोपताना उशाशी पलंगाच्या खाली एका भांड्यात बार्ली ठेवा आणि सकाळी उठल्यावर ती बार्ली गरिबांना वाटून द्या किंवा जनावरांना खाऊ घाला आणि घरातील सर्व सदस्य स्वयंपाकघरातच बसून जेवण करा. जेवणाचे तीन भाग करा. पहिला भाग कावळ्याला खाऊ घाला दुसरा भाग कुत्र्याला खाऊ घाला आणि तिसरा भाग गायला खाऊ घाला. काळ्या कुत्र्याला शनिवारी मोहरीच्या तेलाची पोळी खाऊ घातल्याने फायदा होईल. या साठी हे करू शकता की सव्वा पाच किलो गव्हाचं पीठ आणि सव्वा किलो गूळ घ्या. दोन्ही चे मिश्रण बनवून पोळ्या बनवा आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी गायीला खाऊ घाला. 3 गुरुवार पर्यंत हे केल्यानं दारिद्र्य नाहीसे होतो.
 
4 तिजोरीमध्ये सोनं आणि नोटांची मोजणी- 
लाल किताबानुसार, घरात शुद्ध सोनं आणि केसर एकत्ररित्या ठेवल्यानं आई लक्ष्मीची कृपा मिळते आणि कुटुंबात प्रगती होते. आपल्या तिजोरीत 10 चे 100 पेक्षा जास्त नोटा ठेवा. जेब मध्ये  नेहमी काही नाणी ठेवा. स्वतःला श्रीमंत समजा आणि त्याच प्रकारचे कपडे घाला जे आपल्याला खरेदी करावयाचे आहे त्याची कल्पना करा. जे स्वतःला गरीब मानतात ते नेहमीच गरीब राहतात.  या शिवाय नोटांची एक गड्डी घेऊन दररोज रात्री त्याची मोजणी करून उशाशी ठेवा आणि सकाळी तिजोरी मध्ये ठेवून द्या. 
 
5 उंबरठ्याची पूजा आणि पिंपळाच्या खाली दिवा लावावा -
देवाची पूजा केल्यावर नंतर उंबऱ्याची पूजा करा. उंबरठ्याच्या दोन्ही कडे स्वस्तिक बनवून त्याची पूजा करून स्वस्तिकच्या वर तांदुळाचा ढिगारा ठेवा आणि एक एक सुपारी ला कलावा बांधून ढिगाऱ्यावर ठेवा. हे उपाय केल्यानं धनलाभ होईल. या शिवाय दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि सुवासिक उदबत्ती लावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साप्ताहिक राशीफल 10 ते 16 जानेवारी 2021