Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजपासून शनी होईल अस्त, जाणून घ्या तुमच्या राशीवर त्याचा प्रभाव

shani-dev-asath-know-what-will-be-the-effect-on-your-zodiac-signs
कुंडलीत शनीच्या दशेचा प्रभाव असतो. शनीची दृष्टी पडली तर बनलेले काम देखील बिघडून जातात. शनी जर तुम्हाला साथ देईल तर त्याचा फायदा  होऊ लागतो. न्यायचा देवता म्हणून ओळखणारा शनी सूर्याच्या अत्यंत जवळ असल्यामुळे अस्त होत आहे. शनी 5 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत अस्त राहणार आहे. शनी अस्त असल्यामुळे पाच राशींना भरपूर पैसा मिळणार आहे.  
 
मेष राशीच्या जातकांना अस्त शनीमुळे आर्थिक बाबींवर फायदा मिळेल. पण बर्‍याच महत्त्वाच्या कामांमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे.   
 
वृषभ राशीच्या जातकांना मानसिक क्लेश आणि काळजी राहणार आहे. अत्यधिक कामामुळे सहकारी आणि कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संयम आणि शांतीने काम करा.  
 
मिथुन राशीच्या जातकांसाठी शनीचे अस्त होणे प्रतिकूल राहील.    विरोधी पक्ष त्रास देईल.   
 
कर्क राशीच्या जातकांसाठी अस्त शनी शुभ फलदायी राहणार आहे. प्रयत्न केल्याने जीवनातील विभिन्न क्षेत्रांमध्ये यश मिळेल.  
 
सिंह राशीच्या जातकांना पुढील एक महिन्यापर्यंत अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.  
 
कन्या राशीच्या जातकांसाठी शनीचे अस्त झाल्याने पुढील एक महिन्यापर्यंत त्रास होणार आहे.   
 
तुला राशीच्या लोकांना अस्त शनीमुळे थोडा धीर मिळेल. तसेच कार्यक्षेत्रात यश मिळेल.  
 
वृश्चिक राशीच्या जातकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.  
 
धनू राशीच्या जातकांचे कार्यक्षेत्रा सहकार्‍यांशी मतभेद आणि विवाद होऊ शकत, संयम पाळा.  
 
मकर राशीच्या लोकांना शनी अस्त झाल्याने आर्थिक प्रकरणात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.  
 
कुंभ राशीच्या जातकांसाठी शनीचे अस्त होणे कष्टकारी राहणार आहे.  
 
मीन राशीच्या जातकांना अस्त शनी प्रतिकूल परिणाम देईल.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी