Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

संतती सुख प्राप्त करण्यासाठी काही उपाय

संतती सुख प्राप्त करण्यासाठी काही उपाय
, मंगळवार, 13 जुलै 2021 (16:03 IST)
* गौरी-गणपतीची उपासना करावी.
* संतान गोपाळ यंत्राचे पूजन करावे.
* पाचव्या स्थानात विराजमान असलेल्या शुभ ग्रहांची शांती करून घ्या. पाचव्या स्थानावर दृष्टी असणाऱ्या पाप ग्रहांपासून असणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य व्यक्तीच्या सल्याने उपाययोजना करा.
* शिवलिंगावर तूपाने अभिषेक करा.
* पुष्कराज व हिरा धारण करा.
* कबूतर किंवा चिमणीच्या घरटय़ांना नष्ट करू नका. जर त्यांना हलवावे लागले तर विनाइजा इतरत्र हलवा.
* हळदीच्या सात गाठी प्रत्येक गुरुवारी शिवलिंगावर अर्पित करा.
* संततीप्राप्तीच्या चिकित्सेची बातमी गुप्त ठेवा.
* पहिल्या तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणेची बातमी गुप्त ठेवा.
* गर्भधारणा झाल्यानंतर काळ्या रंगाचा वापर टाळा.
* गर्भधारणा शक्यतो फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यांमध्ये करण्याचा प्रयत्न करा.
* जर शक्य असेल तर श्रेष्ठ नक्षत्रांमध्ये किंवा चांगला योग असताना गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करा.
* गर्भधारणा झाल्यानंतर ताणतणावांपासून दूर राहा. ,भांडणे, रागावू नका. रडू नका. मनात भीती ठेऊ नका. प्रसन्न व हसतमुख राहा.
* शांत, गहिरे व मध्यम गतीचे संगीत ऐका. उग्र संगीत टाळा.
* बीज मंत्राचा जप करा. देवाचे स्मरण करा. चांगले विचार करा.
* आत्मशक्ती जागृत करा. वाईट घटनांचे स्मरण टाळा.
* गायत्री मंत्राचा जप करा.
* गर्भाच्या सुरक्षेसाठी व शक्ती प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
* लाल सूर्याचे स्मरण करा.
* बुद्धीला चालना देणारे खेळ खेळा. उदा. बुद्घिबळ
* गौरीशंकर रुद्राक्षासोबत त्रिमुखी रुद्राक्षाचे तीन रुद्राक्ष धारण करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तुदेवता घरावर नेहमी प्रसन्न राहण्यासाठी हे उपाय करा