Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

धन संकट दूर करण्यासाठी राशीनुसार अमलात आणा उपाय

धन संकट दूर करण्यासाठी राशीनुसार अमलात आणा उपाय
आर्थिक समस्यांमुळे परेशान लोकांसाठी आमचे ज्योतिष सांगत आहे भारताच्या प्राचीन ज्योतिष विद्येचा खजिन्यातून मौल्यवान आणि प्रभावी उपाय. हे उपाय 12 राशीनुसार सांगण्यात आले आहे. आपल्या इष्टाचे स्मरण करत हे उपाय अमलात आणल्याने धन संकट दूर होऊ शकतो.
 
मेष- मेष राशीच्या जातकांनी संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर तेलाचा दिवा लावायला हवा. अधिक फायदा मिळवण्यासाठी त्यात दोन काळे मिरे टाकावे. याने आर्थिक समस्या दूर होईल. या व्यतिरिक्त एखादे प्रकरण अडकले असल्यास त्यातही फायदा होईल.
 
वृषभ- या राशीच्या जातकांनी पिंपळाचे 5 पानं घेऊन त्यावर पिवळं चंदन लावावे. हे पानं वाहत्या पाण्यात किंवा नदीत वाहून द्यावे याने आर्थिक संकट दूर होईल. जमा पुंजीत वृद्धीसाठी पिंपळाच्या झाडाला चंदन लावावे आणि पाणी चढवावे.
 
मिथुन- या राशीच्या जातकांनी व्यवसाय किंवा घरात वृद्धीसाठी वडाचे पाच फळ आणून त्याला लाल चंदनाने रंगवावे. यांना नवीन लाल वस्त्रा काही शिक्क्यांसह गुंडाळून आपल्या घर किंवा दुकानाच्या अग्रभागेत लावावे. याने अकल्पनीय धनाची प्राप्ती होते.
 
कर्क- या राशीच्या जातकांनी धन प्राप्तीसाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा पाचमुखी दिवा लावावा. नंतर हात जोडून देवी लक्ष्मीकडे धन लाभाची प्रार्थना करावी. अचानक धन प्राप्ती होते.
 
सिंह- या राशीचे लोकं आर्थिक नुकसान झेलत असल्यास एक उपाय आहे की शिंपले (कौडी) हळदीच्या पाण्यात घोळून पूजेत ठेवावे. पूजेत ठेवण्यापूर्वी देवी लक्ष्मीसह पूजा करावी.
 
कन्या- या राशीच्या जातकांसाठी खूपच सुंदर उपाय आहे. दोन कमलगट्टे देवी लक्ष्मीच्या मंदिरात अर्पित करत धन प्राप्तीची प्रार्थना करावी.
 
तूळ- या राशीसाठी धन प्राप्ती हेतू खूप सोपा उपाय आहे. आपल्याला शुक्र-पुष्य नक्षत्राची वाट बघावी लागेल. या शुभ नक्षत्रात लक्ष्मी मंदिरात जाऊन पाच नारळ चढवावे आणि सर्वांमध्ये त्याच्या प्रसाद वाटावा. केवळ एक साबूत नारळ घरी आणावे. आपण नंतर हे नारळ वाहत्या पाण्यात वाहून द्यावे.
 
वृश्चिक- या राशीच्या लोकांवर कर्ज असल्यास संध्याकाळी विष्णू-लक्ष्मी मंदिरात जाऊन तेथील पाणी एका पात्रात भरून आणावे, नंतर हे पाणी पिंपळाच्या झाडाला चढवावे. या व्यतिरिक्त वडाच्या पानावर क‍णकेचा दिवा जाळून हनुमान मंदिरात ठेवावा. हा नियम पाच मंगळवार पाळावा.
 
धनू- उंबराच्या झाडाचे अकरा पानं नाडीने गुंडाळून एखाद्या वडाच्या झाडाला बांधावे. या व्यतिरिक्त पिवळे शिपंले (कौड्या) खिशात ठेवू शकतात.
 
मकर- या राशीचे जातक संध्याकाळी एक पोळी स्वत:वरून 21 वेळा ओवाळून तीन रस्ते फुटत असतील अशाजागी ठेवू शकतात. याने घरात भरभराटी येईल.
 
कुंभ- कुंभ राशीच्या जातकांनी विष्णू-लक्ष्मीची संयुक्त रूपाने पूजन व प्रार्थना केली पाहिजे. पूजनस्थळी रात्रभर जागरण करावे. याने आर्थिक अडचण दूर होईल.
 
मीन- मीन राशीच्या जातकांनी काळ्या हळदीची पूजा करून तिजोरीत ठेवावी आणि रोज त्याची पूजा करावी. व्यवसायात लाभ होत नसल्यास समस्या दूर होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 19.06.2018