Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोणत्या तिथीला काय खाण्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या

कोणत्या तिथीला काय खाण्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या
हिंदू धर्मात कोणत्या नक्षत्रात किंवा वाराप्रमाणे भोजन ग्रहण करावे याचा उल्लेख केला गेला आहे. तर जाणून घ्या कोणत्या तिथीला काय सेवन केल्याने काय परिणाम होतात ते.
 
1. प्रतिपदेला कुष्माण्ड (कुभरा पेठा) खाणे टाळावे, हे धन नाशासाठी कारणीभूत ठरतं.
2. द्वितीयेला लहान वांगी किंवा फणस खाणे निषिद्ध आहे.
3. तृतीयेला मुरमुरे खाणे निषिद्ध आहे, याने शत्रूंची संख्या वाढते.
4. चतुर्थीला मुळा खाणे टाळावे, याने धन नाश होतं.
5. पंचमीला बेल खाल्ल्याने कलंक लागण्याची शक्यता असते.
6. षष्ठीला कडुलिंबाचे पान खाणे किंवा याची डगाळ दाताने चावणे निषिद्ध आहे, कारण याने नीच योनी प्राप्त होते.
7. सप्तमीला पाम फळ खाणे टाळावे. याने आजार होण्याची शक्यता असते.
8. अष्टमीला नारळ खाणे निषिद्ध आहे कारण याने बुद्धीचा नाश होतो.
9. नवमीला दुधी भोपळा खाणे योग्य नाही कारण या दिवशी दुधी भोपळा खाणे गोमांस खाण्यासारखे आहे.
10. दशमीला कोबी खाणे निषिद्ध आहे.
11. एकादशीला बटर बीन खाणे टाळावे.
12. द्वादशीला (पोई) मालाबार पालक खाणे निषिद्ध आहे.
13. त्रयोदशीला वांगी खाणे टाळावे.
14. अमावस्या, पौर्णिमा, संक्रांती, चतुर्दशी आणि अष्टमी, रविवार, श्राद्ध व उपासाच्या दिवशी स्त्री सहवास आणि तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्या आणि कांस्य भांड्यात भोजन करणे निषिद्ध आहे.

15. रविवारी आलं खाऊ नये.
16. कार्तिक मासात वांगी आणि माघ मासात मुळा खाणे टाळावे.
17. ओंजळीने किंवा उभे राहून पाणी पिऊ नये.
18. जेवण बेमनाने, वाद करून तयार केलेले असेल किंवा जेवण ओलांडले गेले असलं तर ते सेवन करू नये. असे भोजन राक्षसाचे असतात.
19. लक्ष्मी प्राप्तीची लालसा असल्यास रात्री दही किंवा सातू खाऊ नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तुप्रमाणे भूमि परिक्षण कसे करावे!