Dharma Sangrah

10 ते 16 सप्टेंबर 2017 राशीफल

Webdunia
मेष : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला बचतीकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. म्हणून तुम्हाला या आठवड्यात व्यर्थ खर्चांवर अंकुश लावणे फारच गरजेचे आहे. जर तुम्ही यात अपयशी ठरल्यास तर तुमचे महत्त्वाचे काम धना अभावामुळे बिघडू शकतात. व्यवसायात गुंतवणूक केल्यामुळे तुमचा हात तंग राहू शकतो.

वृषभ : या आठवड्यात तुम्हाला मानसिक सुख आणि दुःख दोघांचा अनुभव होणार आहे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक गरजेना पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन वस्तूची खरेदी करण्याचे मन बनवाल. पण तुम्ही त्याचे आनंद घेण्यास मुकाल. व्यवसायात तुम्हाला सरकारी कारणांमुळे काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. या आठवड्यात तुम्ही मानसिक रूपेण अस्वस्थ व्हाल.

मिथुन : हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत उत्तम राहणार आहे पण आरोग्याच्या बाबतीत थोडे चढ उतार लक्षात येईल. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना पैसा कमावण्याची बरीच संधी मिळणार आहे. स्वतंत्र कार्य करणार्‍या लोकांना लहान सहानं कार्य मिळत राहणार आहे. 13 व 14 तारखेला शासकीय कामात न्यायालयीन अडथळा येण्याची शक्यता आहे.

कर्क : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही स्वास्थ्य आणि आर्थिक पक्षामुळे अधिक काळजीत पडाल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही. तुमचे विश्वासपात्र अधिकारी आणि कर्मचारी तुमच्या गैर हजेरीचा फायदा घेण्याचा भरपूर प्रयत्न  करतील. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे या आठवड्यात अधिक लक्ष द्या. 

सिंह : या आठवड्याच्या सुरुवातीत पारिवारिक वातावरण आनंदाचे ठेवणे तुमच्यासाठी फारच गरजेचे आहे. त्याशिवाय प्रत्येक बाबतीत समजुतदारी आणि समाधानाचे धोरण ठेवावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या वाणीत विनम्रता आणि स्पष्टता आणावे लागणार आहे अन्यथा संबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या उजव्या डोळ्या किंवा कानाचा त्रास होऊ शकतो.

कन्या : आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा निराशाजनक राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीत आर्थिक प्रकरणात काळजी राहण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत संबंधी संपूर्ण आठवडा उत्तम राहणार आहे. 12, 13 आणि 14 तारखेला आर्थिक स्थिती कमजोर राहणार आहे. पण हळू हळू त्यात सुधारणा येईल. तुम्ही तुमचा व्यवसाय बदल करण्याचा मन बनवू शकता.

तूळ :या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी निराशाजनक राहण्याची शक्यता आहे. पारिवारिक वातावरणात तणाव, शारीरिक तंदुरस्तीची काळजी, कर्ज फेडण्यासाठी दबाव, विरोधी सक्रिय होतील, नोकरीत बदली इत्यादी कारणांमुळे मन व्याकुल होईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्थितीत थोडी फार सुधारणा येईल. जमीन, घर व स्थायी मालमत्ता विक्री केल्यामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : आठवड्याच्या सुरुवातीत भाग्याचा साथ मिळणार आहे आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात विकास कराल. तुमच्या सर्व आशा अपेक्षा पूर्ण होण्याचा हा आठवडा आहे. संपूर्ण आठवडा धन मिळाल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. या वेळेस तुमच्या हातात जेवढे ही काम असतील ते पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही भविष्यासाठी गुंतवणूक कराल.

धनू : आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला आर्थिक लाभ झाल्याने तुम्ही आनंद अनुभवाल. या वेळेस तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा मिळू शकतो किंवा जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे, खास करून ते धन जे मिळण्याची उमेद तुम्ही पूर्णपणे सोडली असेल. या काळात लांबणीवर गेलेले बरेच काम पूर्ण होतील आणि काही बाबींचे समाधान निघू शकतात.

मकर : या आठवड्यात तुम्हाला दूरच्या पल्ल्याचा प्रवास करावा लागणार आहे किंवा मनोरंजनावर जास्त वेळ घालवाल. लग्न समारंभ किंवा सामाजिक प्रसंगांमध्ये जाण्याचा योग आहे. मित्र किंवा परिचितांसोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन आनंदाने भरून जाईल. प्रवासादरम्यान लहान सहानं अडचणींचा सामना करावा लागणार आहे. भाऊ बहीण किंवा मावशीपक्षासोबत तुमचे संबंध अधिक घट्ट होतील.

कुंभ : तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. संपूर्ण आठवडा धन येत राहणार आहे. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना स्वत:चे कार्य संपादनासाठी भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडित कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुमची एखाद्या व्यवहाराची बोलणी सुरू असेल तर त्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे.

मीन : या आठवड्याची सुरुवात आर्थिक बाबींसाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यात तुमच्या उत्पन्नाचे बरेच स्रोत राहणार आहे, पण अनायस होणार्‍या खर्चांची शक्यता आपण नाकारू शकत नाही. या आठवड्यात तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. कौटुंबात देखील तुम्हाला महत्त्व मिळेल. सरकारी अधिकारी आणि उच्चाधिकार्‍यांसोबत होणारी भेट तुम्हाला येणार्‍या भविष्यात चांगली फलदायी ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Papmochani Ekadashi 2026 Wishes in Marathi पापमोचनी एकादशीच्या शुभेच्छा

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Papamochani Ekadashi 2026 पापमोचनी एकादशी कधी? २ शुभ योगांमध्ये विष्णू पूजा, तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

Chaitra Navratri 2026 Vastu नवरात्रीत घरात ठेवा या 5 गोष्टी; नकारात्मक ऊर्जा दूर होईल

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख
Show comments