कोणत्याही महिन्याच्या पंचमीला कणकेत थोडी हळद घालून ती भिजवावी. तिचे सात नाग (सुमारे एक वितीचे) करुत ने पाटावर एका रांगेत मांडावेत. नागांची तोंडे आपणाकडे करावीत. त्या सप्तनागांवर फुलांनी पाणी शिंपडून त्यांची पूजा करावी. गंध, फुले, हळद, कुंकू वाहावे व धूपदीप ओवाळावा. नंतर लाह्या व दूध यांचा मनोभावे नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी शक्यतो पिवळी वस्त्रे धारण करावीत.
सांयकाळी पूजा विसर्जन करुन ते नाग शुद्ध ठिकाणी सोडावेत. पाण्यात सोडू नयेत. व्रत केल्यापासून 19 दिवसात जर स्वप्नात नागदर्शन घडले तर लवकरच दीघार्युषी संतती होईल. हे व्रत नारायण नागबळी वगैरे खर्चिक विधी करण्यापेक्षा किती तरी सोपे असून तितकेच प्रभावी ठरणारे आहेत.
अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.