घरात सुख-समृद्धीसाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात. तरी प्रपंचामुळे अनेकदा खूप धार्मिक कृत्ये करणे शक्य होत नाही. मात्र दररोज काही प्रभावी उपाय करुन आनंदी वातावरण ठेवण्यात मदत होऊ शकते.
* सकाळी प्रात:विधी आटोपल्यानंतर स्नान करताना जगदंब जगदंब असा जप करावा. तयार होऊन कुंकु लावेपर्यंत जप सुरु ठेवावा नंतर श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणत बंद करावा.
* सर्वप्रथम घरातील चूल अगर गॅसला हळदकुंकु वाहावे आणि मगच चहा बवण्यास सुरुवात करावी. ज्यामुळे आपल्या कुटुंबाला सुग्रास अन्न मिळत व शरीराला पोषण मिळतं. याला अग्नीदेवतेची पूजा म्हणतात.
* घराच्या अंगणात तुळस असल्यास पाणी घालून नमस्कार करावा. अंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी घालू नये.
* सोमवार आणि बुधवार या दिवशी शुभ्र वस्त्रे तर मंगळवारी लालसर किंवा गुलाबी तर गुरुवारी पिवळे आणि शनिवारी निळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी. याने ग्रह प्रसन्न होतात.
* उंबरठ्याबाहेर रांगोळीने श्रीराम लिहावे. तसेच स्वस्तिक काढावे आणि त्यावर हळद-कुंकु वाहावे. याने दारात संकटे, दु:खे वगैरे येण्यास प्रतिबंध होतो. रांगोळी अशुभ निवारक यंत्रप्रमाणे कार्य करते.
* जेवताना ताटात मिठाशिवाय सर्व पदार्थ वाढावे आणि देवाला जेवण्याचे आवाहान करत प्रार्थना करावी. ताटास हात लावून देवा भोजनास या अशी प्रार्थना देखील करु शकता. आपण देवाचं नाव घेऊन देखील प्रार्थना करु शकता.
* रात्री झोपताना डोळे मिटून भुवयांमध्ये दृष्टी लावून ऊँ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 27 वेळा जप करावा. एखादा गुरुमंत्र असल्यास त्याचा जप करावा. मग आनंदाने झोपी जावे.
* मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवस सूर्यास्तपर्यंत किंवा शक्य असल्यास झोपेपर्यंत मौन पाळावे. ही साधना कठिण असली तरी त्याचे फळ खूप दिव्य आहे. अती आवश्यक असल्यास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत मात्र आपण होऊन कोणाशी देखील बोलणे टाळावे.
या सोप्या उपयांमुळे घरात शांती आणि समृद्धी नांदते.