ज्योतिष्यामध्ये सर्वात अशुभ योगात एक यमघंटक योग देखील आहे. या योगात शुभ कार्य वर्जित असतात. अर्थात या योगात व्यक्ती द्वारे करण्यात आलेल्या शुभ कार्यांमध्ये अपयशी होण्याची शंका वाढून जाते. तर जाणून घेऊ काय असत यमघंटक योग. या योगात शुभ काम न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ज्योतिष्यानुसार कुठल्याही कार्याला करण्यासाठी शुभ योग-संयोगांचे होणे आवश्यक आहे. शुभ वेळेचा आधार तिथी, नक्षत्र, चंद्र स्थिती, योगिनी दशा आणि ग्रह स्थितीच्या आधारावर करण्यात येतो.
शुभ कामांना करण्यासाठी त्याज्य मानण्यात आलेल्या या योगांचे निर्धारानं करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहे. म्हणून शुभ कामांना करण्यासाठी या अशुभ योगांना सोडणे फारच गरजेचे आहे.
यात्रा, मुलांसाठी करण्यात आलेले शुभ कार्य तथा संतानच्या जन्माच्या वेळेवर देखील या योगाचा विचार केला जातो आणि जर योग उपस्थित असेल तर यथासंभव, कार्यांना टाळणे फारच गरजेचे आहे, संतानं जन्म तो ईश्वरीय देणगी आहे पण जर यमघटंक योग असेल तर विद्वान ब्राह्मणांकडून याची शांती करणे गरजेचे आहे.
वशिष्ठ ऋषी द्वारा फलित ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे की दिवसकाळात जर यमघंटक नावाचा दुष्ट योग असेल तर मृत्युतुल्य कष्ट होऊ शकतो, पण रात्रीच्या वेळेस याचे फळ जास्त अशुभ मिळत नाही.