Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महिलांनी आर्थिक आव्हानांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे

महिलांनी आर्थिक आव्हानांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे
, मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (13:17 IST)
पैसे म्हणतात “जर तू मला आज वाचवलेस तर, मी तुला उद्या वाचवेन,” 
आपण अर्थ उन्मुख असल्याने आपले पैसे बारकाईने पाहिले जात असतात आणि म्हटल्या प्रमाणे जे पेरतो तेच उगवते. बऱ्याचदा आपण प्रेम हे पैशांपेक्षा प्रिय असल्याचे ऐकत असलो, तरीसुद्धा असे कधी ऐकले आहे की मिठी आपले बिल भरु शकते? पैसा महत्वाचा असतो आणि आर्थिक विवेक अधिक महत्त्वाचा असतो. आपण किती पैसे कमावले त्यापेक्षा आपण किती पैसे ठेवता आणि ते आपल्यासाठी कसे कार्य करते. हे योग्य म्हटले आहे की, तुमची कमाई नाही तर तुमची बचत तुम्हाला श्रीमंत बनवते. तुमची बचत आणि खर्च तुमची आर्थिक शिल्लक असल्याचे सांगते.
 
पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यावर मात करण्याची वैयक्तिक क्षमता यावर अवलंबून असते.
 
शतकानुशतकांच्या परंपरेने स्पष्टपणे सांगितले आहे की, पुरुष हा कुटुंबासाठी आधार देणारा आणि कुटुंबासाठी आर्थिक सहाय्यक करणारा मुख्य व्यक्ती आहे. स्त्रियांसाठी, शतकानुशतके समाजाने स्वयंपाक आणि कुटुंबाचा सांभाळ करणारे म्हणून वर्गीकरण केले आहे. मुलगी मोठी झाल्यावर तिला घरकाम करण्याचे शिक्षण दिले जाते जेणेकरून ती चांगली पत्नी, सून आणि कुटुंबासाठी आई होऊ शकेल. आर्थिक स्वातंत्र्य हा सर्वात मोठा धडा आहे जो ती शिकण्यापासून वंचित राहते. मुलींचे पालनपोषण करण्यामागील आर्थिक आव्हान असताना, काळ बदलत असताना आपण पाहत आहोत. एआरपीने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की ४० ते ७९ वयोगटातील घटस्फोटित, विधवा, नोकरी गमावलेल्या, सेवानिवृत्त इत्यादी महिला मोठ्या आर्थिक पेचप्रसंगाने ग्रस्त आहेत आणि आर्थिक साक्षर नसल्याबद्दल खंत व्यक्त करत आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला कमी पैसे कमवतात आणि बर्याच महिलांना घर आणि मुलांसाठी आपल्या करियरचा त्याग हि करावा लागतो.
 
महिलांशी संवाद साधताना मला त्यांच्या वित्तीय व्यवस्थापनाच्या क्षमतेवर मिश्रित प्रतिसाद मिळाला. योग्य अर्थसंकल्पानंतर काही लोक आर्थिक उद्दीष्टे, विवेकी गुंतवणूक ठरवून त्यांचे वित्त व्यवस्थापन करण्याविषयी विश्वास ठेवतात, परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांनी आपल्या जोडीदारावर वैयक्तिक वित्त व्यवस्थापित करण्याची जबाबदारी दिली आहे. सर्वसाधारणपणे महिलांसाठी, आर्थिक साक्षरतेचा अभाव, त्यांच्या करिअर मध्ये खंड पडणे, पुरुष सदस्यांवर जास्त अवलंबून असणे ही आर्थिक आव्हाने उभी राहिली असल्याचे निदर्शनास आले.
 
मी दोन मुलांची आई असलेल्या स्मिताशी बोललो, त्यांनी मला हे सांगून चकित केले की, “गृहिणी बनणे, माझ्या मुलांचे संगोपन करणे आणि घर सांभाळणे मला कोणत्याही प्रकारे पैसे वाचविण्यास किंवा पाहण्यास प्रतिबंधित करत नाही. खरं तर, माझ्याकडे माझ्या गुंतवणूकीचे नियोजन करण्यासाठी अधिक वेळ आहे आणि मी घर चालवित असताना आर्थिकदृष्ट्या जबाबदार आहे. ”उलट, एमएनसी मध्ये काम करणारी विद्या म्हणाली,“मी माझा पगार माझ्या पतीकडे देते आणि तो सर्व आर्थिक बाबींचा निर्णय घेतो. मी स्वत:ला त्यापासून दूर ठेवते ”. आपण गृहिणींकडून आर्थिक बाबतीत कमी जागरूक असण्याची अपेक्षा करतो, उलट ही एक करिअर करणारी महिला होती जिने मला हा धक्का दिला की तिला वित्त कसे व्यवस्थापित केले जाते याबद्दल कमी काळजी आहे. याचे श्रेय मी मानसिकतेलाही देतो. परंतु महिलांनी स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक समतोल राखण्यात आपली मोठी भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी जागे होण्याची ही वेळ आहे. एक स्त्री म्हणून आपले आर्थिक भविष्य निवडणे महत्वाचे आहे आणि घरातील माणूस एकटाच जबाबदार आहे असा जुनाट विचार काढून टाकायला हवा.

शैक्षणिक संस्थेसाठी काम करणार्या स्टेफीला खर्चात एखादे लॉगबुक राखण्या विषयी आत्मविश्वास वाटू लागला आहे, ती अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची आर्थिक उद्दीष्टेही या विषयीही बोलली. विसाव्या वर्षातील एका महिलेने आपल्या आर्थिक योजनांबद्दल इतका आत्मविश्वास बाळगणे आश्चर्यकारक आहे, तर दुसरी मुलगी काम करणारी लताला याबद्दल प्रयत्न करायलाही कंटाळा येतो  किंवा राधा जिला नेहमीच वाटते की कुटुंब आर्थिक काळजी घ्यायला असते. काळजीपूर्वक अर्थसंकल्प, नियोजन बचतीचे पर्याय, विमा पॉलिसी, सेवानिवृत्तीच्या योजनांवर कार्य करणे ही प्रत्येक महिलेच्या सुदृढ आर्थिक भवितव्यासाठी आवश्यक पावले आहेत. आणि जेव्हा आपण तरूण असतो तेव्हाच याची सुरुवात करावी लागेल.

आर्थिक जबाबदारी लिंग-विशिष्ट नसते, हे महिलांसाठी हि तितकेच अत्यावश्यक आहे जितके पुरुषांसाठी आहे. महिलाना सामोरे जाणाऱ्या आर्थिक आव्हानांवर अशा विशिष्ट कृतींद्वारे मात करता येते जसे की:
एखाद्याला गुंतवणूक कशी करावी हे माहित नसल्यास, त्यासाठी गुंतवणूक करण्याची कला शिकण्यास उशीर झालेला नाही.
गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाबद्दल चांगला सल्ला देऊ शकणारे मित्र आणि नातेवाईक शोधा. आधार शोधल्याने सामर्थ्य वाढवते आणि दुर्बलतेवर मात करता येते.
पैसा योजनेचा भाग व्हा आणि आर्थिक निर्णय घेण्यात अधिक सक्रिय व्हा.
आपली मालमत्ता, उत्पन्न आणि खर्चांची यादी असेल अशा बजेटसह तयार रहा, जे आपल्या आर्थिक स्थितीचा हिशेब तयार ठेवेल.
आयुर्विमा, आरोग्य किंवा मेडिक्लेम पॉलिसी, उत्पन्न संरक्षण योजना इत्यादींवर खर्च केलेल्या स्वतःच्या आणि असे कौटुंबिक पैशाचे चांगले उपयोग करण्याचे विश्लेषण करा.
हे समजून घेण्यासारखे आहे की, समाजाची मानसिकता बदलण्यासाठी, समाजाला प्रभावित करण्यासाठी कठीण जात आहे, आणि स्त्रियांना समान वागणूक देण्यासाठी कार्यस्थळांचे रूपांतर करणे सोपे नाही, परंतु स्त्रिया आर्थिक नियंत्रण घेऊ शकतात आणि त्यांचे आर्थिक व्यवस्थापन करणे ही स्त्रीची सर्वात चांगली निवड आहे. केवळ महिला स्वतःमध्ये सुज्ञ गुंतवणूकीद्वारे आत्मविश्वास वाढवितात आणि पैशाच्या व्यवस्थापन कौशल्याद्वारे आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेवून फरक आणू शकतात.

डॉ. लक्ष्मी मोहन, संचालक, आयटीएम बिझिनेस स्कूल, खारघर 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवाजींची सहनशीलता