Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयआयटी मुंबईच्या इनोव्हेटरने विकसित केलेले डायबेटिक फुट स्क्रीनिंग उपकरण सादर

Webdunia
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (11:29 IST)
नावीन्यपूर्ण आणि वाजवी खर्चात सेमी-ऑटोमॅटिक पद्धतीने डायबेटिक फुट न्यूरोपथी या आजाराची चाचणी करणारे उपकरण मेडिकल डिव्हाइस इनोव्हेशन कॅम्पमध्ये पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते सादर करण्यात आले. या वेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शुभाशीष चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 
 
अत्यंत प्रतिष्ठित अशा इंटेल कंपनीमधील नोकरी नाकारून कमी खर्चातील पोर्टेबल डायबेटिक फुट स्कॅनर विकसित करणारे आणि व्यावसायिक तत्वावर उपलब्ध करून देणारे इनोव्हेटर निशांत कंठपाल हे आयआयटी मुंबईच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शाखेचे माजी विद्यार्थी आहेत. या सादरीकरणाच्या वेळे निशात यांनी या उपकरणाविषयी विस्तृत माहिती दिली. “आमचे उपकरण उतींचा ताठरपणा (टिश्यु स्टिफनेस) या नव्या संकल्पनेवर आधारित आहे. यापूर्वी या संकल्पनेचा या उपकरणांमध्ये उपयोग केलेला नाही. या पद्धतीमुळे रुग्णाची चाचणी लवकर होते आणि ती अधिक विश्वासार्ह असते. त्यामुळे परिणामकारक उपचार केले जातात.”, असे ते म्हणाले. 
 
आयआयटी मुंबईतील एसआयएनई या बिझनेस इन्क्युबेटरमध्ये निशांत यांनी स्थापन केलेल्या ‘अयाती डिव्हाइसेस’ या स्टार्टअप कंपनीला आयआयटी मुंबईने डायबेटिक फुट स्क्रीनरचे आयपी (बौद्धिक संपदा) देऊ केले आहे. या कार्यक्रमात परवाना करारावर स्वाक्षरी होऊन तो निशांत यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. त्यांची स्टार्ट अप कंपनी बीआयआरएसीकडून मिळणाऱ्या ५० लाखांच्या इग्निशन ग्रँटसाठी आधीपासूनच पात्र आहे. 
 
आयआयटी मुंबईतील बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी (इन्क्युबेशन) सेंटर (बेटिक) येथे नवी मुंबई येथील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसमधील डॉ. रजनी मुल्लेरपाटण यांच्या नेतृत्वाखालील क्निनिशिअन्सच्या सहयोगाने गेल्या चार वर्षांत हे उपकरण विकसित करण्यात आले. 
 
बेटिकचे संस्थापक प्रा. रवी या वेळी म्हणाले, “या उत्पादनाची पुढील नियामक वाटचाल कशी असेल हे जाणून घेण्यासाठी आम्ही केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडे (सीडीएससीओ) अर्ज केला. येथे मला सांगताना आनंद होत आहे की, काल आम्हाला सीडीएससीओकडून पत्र मिळाले आहे आणि डायबेटिक फुट स्क्रीनिंग उपकरण हे नॉन-नोटिफाइड असल्याचे त्यात नमूद केले आहे. त्यामुळे या उत्पादनासंबंधी वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यावर त्याच्या उत्पादनाचा आणि पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.” 
नवी मुंबई येथील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस आणि माहीम येथील एसएल रहेजा डायबेटिस रिसर्च सेंटरमध्ये येथे या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या दोन्ही रुग्णालयांमधील आचार समित्यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. वैद्यकीय चाचणीच्या प्रक्रियेत सहभाग असलेल्या एमजीएमआयएचएसमधील डॉ. जुही यांनी ही प्रक्रिया विस्तृतपणे समजावून सांगितली. 
 
“ज्या व्यक्तींना दीर्घकाळापासून मधुमेह आहे त्यांच्यापैकी १०% रुग्णांमध्ये डायबेटिक फुट हा आजार दिसून येतो. त्यांच्या पायांमध्ये अल्सर विकसित होतो. परिणामी, पाय कापावा लागतो. या उपकरणामुळे असे रुग्ण निश्चित होऊ शकतात, जे काळजी घेऊ शकतात आणि त्यावर उपचार घेऊन फुट अॅम्प्युटेशन (पाय कापावा लागणे) टाळता येऊ शकते.”, असे बेटिकचे एसईओ डॉ. रुपेश घ्यार म्हणाले.
 
डॉ. अनिल काकोडकर यांनी निशांत यांचे अभिनंदन केले आणि बाजारपेठेत नावीन्यपूर्ण मेड-टेक (वैद्यकीय-तंत्रज्ञान)  उत्पादने सादर करणे अत्यंत आव्हानात्मक असते असे ते म्हणाले. नावीन्यपूर्ण वैद्यकीय उपकरण बाजारपेठेत आणण्यासाठी बेटिकच्या टीमने केलेल्या अविरत प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. 
 
संशोधन प्रतिरूपे व्यावसायिक उत्पादनांमध्ये रूपांतरीत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी बेटिक टीमतर्फे तयार करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शुभाशीष चौधरी यांनी बेटिक टीमचे अभिनंदन केले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

पनीर चीज कटलेट्स रेसिपी

तुम्हालाही गोष्टी आठवत नाहीत का? हे ब्रेन फॉग, असू शकते, उपचार जाणून घ्या

उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पुढील लेख
Show comments