Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय

Webdunia
शुक्रवार, 19 जुलै 2019 (14:28 IST)
दुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा अनुभव तुम्हीही अनेकदा घेतला असेल. खास करून सणावाराच्या दिवशी गोडधोड खाल्ल्यानंतर वा जड जेवण झाल्यानंतर तर असा अनुभव अधिकच येतो. हा तर सर्वांचाच अनुभव आहे. याचसाठी पूर्वी भोजनानंतर वामकुक्षी घ्यावी म्हणजे डाव्या कुशीवर झोपावे असे म्हणत असत.
 
काही लोकांना तर दुपारचं जेवण केल्यानंतर मस्तपैकी झोप काढण्याची सवय असते. त्यांना ती झोप मानवतेही, पण नोकरी करणाऱ्या, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मात्र हे कदापि शक्‍य नसतं. अगदी सुट्टीच्या दिवशीही त्यांच्यामागे आठवडाभराची साठलेली घरची कामे करण्याचे टेन्शन असते. दुपारचं जेवण केल्यावर झोप येऊ लागते आणि सोबतच आळसही येतो. दुपारच्या जेवणाआधीची आपली सक्रियता आणि दुपारच्या जेवणानंतरची आपली सक्रियता यातही फरक दिसतो, पण असं का होत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
दुपारचे जेवण केल्यावर झोप येण्याचं कारण पचनतंत्राशी संबंधित आहे. जेवण केल्यानंतर जेव्हा आपल्या शरीरात पचनक्रिया सुरू होते तेव्हा पचन संस्थांना अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. अन्न पचवण्यासाठी त्यांना अतिरिक्त एंजाइमचा स्राव करावा लागतो. ही गरज रक्तातून भागवली जाते. अशा स्थितीत रक्तप्रवाह पचनसंस्थांकडे अधिक वळवला जातो. परिणामी यावेळी मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो. मेंदूमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याने मेंदू कमी क्रियाशील होतो. ज्यामुळे थकवा आणि आळस येतो. त्यामुळे झोपही येऊ लागते.
 
सकाळी जास्त क्रियाशील असतो मेंदू
 
जर झोपेचा संबंध हा पचन तंत्राशी आहे तर स्वाभाविकपणे असाही प्रश्‍न उभा राहतो की, नाश्‍ता केल्यावर झोप का येत नाही? खरं तर नाश्‍ता ज्यावेळी केला जातो. त्यावेळी आपला मेंदू फार क्रियाशील असतो. मेंदू एका मोठ्या झोपेनंतर आणि आरामानंतर सक्रिय झालेला असतो, पण दुपारच्या जेवणापर्यंत मेंदूची ऊर्जा आधीच्या तुलनेत अधिक खर्च झालेली असते. अशावेळी ऑक्‍सिजन कमी झाल्याने मेंदू काम करण्यासाठी लगेच तयार होऊ शकत नाही.
जर तुम्ही नोकरी करता, ऑफिसमध्ये काम करता आणि दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला झोप येण्याची समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी एक मार्ग आहे. दुपारच्या जेवणात कमीत कमी कॅलरी असाव्यात असा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे हलका आहार घ्या. जास्त कॅलरी असलेला आहार घेतल्याने जास्त झोप येते. डीप फ्राय आणि हेवी फूड पचवण्याला पचनसंस्थेला अधिक काम करावे लागते. त्यामुळे दुपारच्या जेवणात तळलेले पदार्थ आणि पचायला जड पदार्थ यांचा समावेश करणे टाळा.
 
अनुराधा पवार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments