Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Heart Attack आणि Cardiac Arrest यामध्ये काय फरक असतो, आणि या पैकी जास्त धोका कशात आहे?

Heart Attack आणि Cardiac Arrest यामध्ये काय फरक असतो, आणि या पैकी जास्त धोका कशात आहे?
असेही बरेच लोकं आहे जे हृदयाच्या आजारामुळे आपले प्राण गमवून बसले आहेत. आपण कार्डियकअरेस्ट आणि हार्ट अटॅकबद्दल ऐकले असतील. कार्डियक अरेस्टच्या स्थितीत हृदय रक्ताभिसरण थांबवतं. बहुधा लोकं याला हार्ट अटॅक असे समजतात, पण या दोघात अंतर आहे.
 
जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंमधील रक्त परिसंचरण एकाएकी थांबून जात. पण कार्डियक अरेस्ट मध्ये तर हृदय रक्ताभिसरणच बंद करतं. जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा हृदय शरीराच्या बाकी भागास रक्ताभिसरण करतं राहत पण कार्डियक अरेस्ट मध्ये असे होत नाही आणि श्वास देखील घेता येत नाही.
 
हार्ट अटॅक मध्ये माणूस शुद्धीत असतो. पण कार्डियक अरेस्ट मध्ये माणसाची कोमात जाण्याची दाट शक्यता असते.
 
कार्डियक अरेस्ट मध्ये एकाएकी हृदयाची गती थांबते आणि अश्या परिस्थितीत माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो. हे हृदयाचे असे आजार आहे ज्यामध्ये मेंदू आणि सर्व अवयवांमध्ये रक्त परिसंचरण थांबते.
 
हार्टअटॅक किंवा हृदयाच्या विकाराच्या झटक्याचे लक्षण 1 महिन्यापूर्वी पासून सुरू होऊ लागतात,जसे की -
 
* छातीत अस्वस्थता जाणवते
* थकवा
* सूज
* सर्दी राहते
* चक्कर येणे
 
त्याशिवाय जर आपल्याला श्वास घेण्यास कोणत्याही प्रकाराचे बदल किंवा कमीपणा जाणवत असल्यास, तर हे देखील हृदयाच्या झटक्याचे लक्षणे असू शकतात.जेव्हा हृदय योग्यरीत्या आपले काम करण्यात सक्षम नसते तेव्हा फुफ्फुसांपर्यंत जेवढी गरज असते तेवढी ऑक्सिजन पोहोचत नाही.
 
कार्डियक अरेस्टची लक्षणे :
* चक्कर येऊन पडणे
* धाप लागणे
* बेशुद्ध होणे
* चक्कर येणे
* जीव घाबरणे
* अस्वस्थता
* छातीत दुखणे
*  श्वसनाचा त्रास

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपल्याला देखील महिन्यातून दोनदा मासिक पाळी येते का? जाणून घेऊ या ही 5 कारणे...