Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सकाळी अनोश्यापोटी चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे

Marathi Health article  Drinking tea in the morning is harmful
, शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (19:30 IST)
बऱ्याच लोकांची सवय असते सकाळी उठल्यावर चहा पिण्याची. काही लोकांना तर पलंगावरच चहा लागतो. पण ही सवय चुकीची आहे. जर आपण देखील आपल्या दिवसाची सुरुवात चहा घेऊन करता तर ही सवय लगेच बदला. अनोश्या पोटी चहा घेतल्यानं शरीराला नुकसान होत. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 पचनाशी निगडित समस्या उद्भवतात-
सकाळी उठल्यावर अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं पचनाशी निगडित समस्या उद्भवतात. आतड्याचे बेक्टेरिया पचन तंत्राला बळकट करण्याचे काम करतात. अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं आतड्या बेक्टेरियाला नुकसान होते, ज्यामुळे पचनाशी निगडित समस्या उद्भवतात.
 
2 तोंडाचा वास येतो -
सकाळी अनोश्यापोटी चहाचे सेवन केल्यानं तोंडाच्या आरोग्याला देखील नुकसान होतो. या मुळे तोंडातून घाण वास येतो. जर आपल्याला देखील ही सवय आहे. तर ही सवय लगेच बदला. 
 
3 लघवी जास्त प्रमाणात येते-
दिवसाची सुरुवात चहा ने करणाऱ्यांना लघवी जास्त प्रमाणात येऊ लागते. लघवी जास्त प्रमाणात येऊ लागल्यानं शरीरात पाण्याची कमतरता होऊ लागते. या मुळे अनेक समस्यांना सामोरी जावे लागते.
 
4 पोट स्वच्छ होत नाही-
चहा मध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असतात आणि कॅफीनच्या सेवनाने दिवसाची सुरुवात करणे चांगले नाही. सकाळी अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं पोट चांगल्या प्रकाराने स्वच्छ होत नाही. पोट स्वच्छ न झाल्यामुळे आजारी पडण्याचा धोका संभवतो.निरोगी राहण्यासाठी पोट स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. 
 
5 ऍसिडिटीचा त्रास होतो-
सकाळी अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं ऍसिडिटीची समस्या होते. जर आपण देखील सकाळी उठल्यावर चहा पिण्याची आवड ठेवता तर आजच ही सवय सोडा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॅलेंटाइन विशेष : प्रॉमिस डे