Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निपुत्रिक जोडप्यांसाठी FET ठरते आहे आशेचा किरण

Webdunia
सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (22:43 IST)
वंध्यत्व ही एक अतिशय गुंतागुंतीची आणि निराशाजनक समस्या आहे, जी आज गर्भधारणेचा प्रयत्न करणार्‍या अंदाजे १५% जोडप्यांना प्रभावित करते आहे. निपुत्रीक जोडप्यांना अनेकदा त्यांच्या स्वतःच्या समाजात त्यांना आपत्य नसल्याकारणामुळे अलिप्त झाल्याची भावना येते. स्वतःचे मूल नसल्याकारणामुळे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध ठेवणे त्यांना आव्हानात्मक जाऊ शकते.
 
जर, तुम्हीदेखील या समस्येमधून जात असाल, तर तुम्हाला आता निराश होण्याची काहीच गरज नाही. कारण, तुम्ही देखील याच समाजाचा भाग असून, पोरंबाळ असलेल्या तुमच्या मित्रांमध्ये आणि तुमच्यात वेगळे असे काहीही नाही आहे! अयशस्वी झालेल्या IVF प्रक्रियेमुळे आता निराश होण्याची काहीच गरज नाही. कारण FET ही प्रगत वैद्यकीय उपचार पद्धती तूमच्यासाठी आशेचा किरण घेऊ आली आहे.
 
अलिकडच्या काळात फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर (FETs) प्रक्रिया अधिक यशस्वी होत आहे, ज्यामुळे अयशस्वी झालेली IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) सायकल पुन्हा सुरू करण्यापूर्वी, जोडप्यांनी या विकसित उपचार पद्धतीचा विचार करण्याचा अधिकाधिक सामान्य पर्याय बनला आहे.
 
फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर (FET) म्हणजे काय?
फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर (FET) ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये IVF द्वारे तयार करण्यात आलेले भ्रूण फ्रीझिंग आणि जतन केले जाते, ज्याचे भविष्यात स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करता येते. हे गोठवलेले भ्रूण तुमचे असू शकते किंवा काही दाम्पत्य स्वखुशीने आपले गोठवलेले भ्रूण दुसऱ्या जोडप्यांसाठी दान करू शकतात.
IVF प्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करण्यापेक्षा, आगाऊ जतन केलेले भ्रूण जर असेल तर त्याचे यशस्वी रोपण गर्भाशयात करता येऊ शकते.
 
आज अनेक तरुण मुली,आपले निरोगी बिजांड भविष्यातील वापरासाठी जतन करण्याच्या योजना आखतात, ते त्यांचे बिजांड क्रायोप्रीझव्‍‌र्ह प्रक्रियेदवारे गोठवून भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवतात. जोपर्यंत त्यांची करिअरची उद्दिष्टे साध्य होत नाहीत किंवा त्यांना कुटुंब सुरू करण्याची इच्छा असलेला जोडीदार मिळत नाही, त्यांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्याचा हा एक आधुनिक मार्ग आहे.
 
FET प्रक्रियेचा अवलंब करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या
FET प्रक्रियेला जाण्यापूर्वी दाम्पत्यांनी पहिली गोष्ट ही लक्षात घेणे गरजेचे आहे की, त्यांचे भ्रूण क्रायोप्रीझव्‍‌र्ह अवस्थेत साठवून ठेवण्याची संकल्पना त्यांना सोयीस्कर आहे की नाही. काही लोकांसाठी, त्यांचे भ्रूण गोठवण्याचा विचार भावनिकदृष्ट्या खडतर असू शकतो, त्यामुळे ते त्यांचे ताजे भ्रूण रोपण करणे अधिक पसंत करतात, आणि इतर भ्रूण गोठवण्याचा पर्याय निवडतात, जे काही वर्षांनी दुसरं मूल हवं असल्यास त्याचा वापर करता येतो.
 
FET चा अवलंब करताना दाम्पत्यांनी आणखी एक गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे आर्थिक खर्च! गोठवलेल्या भ्रूणापेक्षा, ताजे भ्रूण गर्भाशयात रोपण करण्याचा खर्च अधिक जास्त असतो, म्हणूनच जोडप्यांनी आपले आर्थिक गणित देखील विचारात घेणे गरजेचे असते. तुम्ही जर भारतात गोठवलेल्या भ्रूणाद्वारे गर्भधारणा करण्याचा म्हणजेच FET उपचाराचा विचार करत असल्यास, तुम्ही त्यासाठी किती सक्षम आहात? हे पाहण्यासाठी एखाद्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण या प्रक्रियेसाठी पुरुष आणि स्त्री या दोघांची शारीरिक क्षमता चांगली असणे आवश्यक असते. त्यामुळे, आपल्या प्रजनन क्षमतेची माहिती करून घेतल्यानंतरच हा पर्याय निवडा.
 
ताजे भ्रूणापासून गर्भधारणेपेक्षा गोठवलेले भ्रूणपासून गर्भधारण करण्याच्या FET या प्रक्रियेचे काय फायदे आहेत?
 
FET प्रक्रियेचे अनेक फायदे आहेत.
 या पद्धतीमध्ये स्त्री बीजांडं आणि पुरुषाचे शुक्राणू यांपासून फलन प्रक्रिया आधीच पूर्ण झालेली असते, त्यामुळे FET उपचार प्रक्रियेचा खर्च नव्याने करण्यात येणाऱ्या IVF उपचारापेक्षा लक्षणीयरीत्या कमी असतो.
 
 FET उपचार प्रक्रियेचे आगाऊ नियोजन केले जाऊ शकते, ज्यामुळे व्यस्त वेळापत्रक असलेल्या हिलांसाठी ते उपयुक्त ठरू शकते. मात्र IVF उपचारात त्याचे काटेकोरपणे नियमन करावे लागते जे कठीण होऊ शकते.
 FET पद्धतीमध्ये भ्रूण आधीच तयार झालेला असतो, त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचते आणि ओवरीज हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम (OHSS) विकसित होण्याचा धोका कमी होतो.
 ज्या जोडप्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या IVF सायकलमध्ये स्वतःची किंवा दात्यांची शुक्राणू किंवा अंडी वापरली आहेत, त्यांनी त्यांचे कुटुंब सुरू करण्यापूर्वी त्यांना किती मुलांची गर्भधारणा करायची आहे हे ठरवून होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
 पहिलं मूल या प्रक्रियेतून झाल्यानंतर काही वर्षांनी दुसरं मूल हवं असल्यासही जोडपी हा पर्याय निवडू शकतात. अशावेळी नवीन दाता शोधण्याच्या प्रक्रियेतून न जाता त्यांना त्यांची सर्व मुले एका दात्याकडून मिळू शकतात.
 काही जोडप्यांना एका वेळी फक्त एकच मुलाला जन्म देणे अधिक सोयीस्कर वाटू शकते, याला इलेक्टिव्ह सिंगल एम्ब्रीओ ट्रान्सफर (eSE) असे म्हणतात आणि उच्च इम्प्लांटेशन दर राखून ते मल्टिपल जन्मांचा धोका कमी करू शकतात. तसेच इतर भ्रूण भविष्यातील वापरासाठी ते राखीव ठेवू शकतात.
 कर्करोग किंवा तत्सम जटिल आजारात उपचार पूर्ण झाल्याशिवाय गर्भधारणा स्त्रीसाठी शक्य नसते. या आजारांच्या उपचारांचा अनेकदा प्रजनन आरोग्यावर परिणाम होतो. अशावेळी उपचार सुरु करण्याआधी बीजांडं किंवा भ्रूण गोठवून जतन करण्याचा पर्याय जोडपी निवडतात. जेणेकरून आजारातून पूर्ण बरं झाल्यानंतर त्यांना मुलासाठी चान्स घेता येईल.
 गोठविण्याच्या तंत्रावर आणि गोठविलेल्या भ्रूणांची सर्वोत्तम काळजी कशी घ्यावी यावर अधिक संशोधन होत असल्याने, FETs पद्धतीचा यशस्वी दर सातत्याने वाढत आहेत. म्हणजेच, पूर्वीपेक्षा जास्त जोडपी या सुरक्षित आणि प्रभावी प्रजनन उपचार पर्यायाचा लाभ घेऊ शकतात.
 ज्या स्त्रिया नुकत्याच अयशस्वी IVF प्रक्रियेमधून गेल्या आहेत, ते FET पद्धतीद्वारे उपचार नियमावलीचा अवलंब करू शकतात, कारण प्रत्येक क्लिनिकमध्ये IVF उपचारचक्राचे नियोजन आणि कार्यप्रदर्शन करण्याचा स्वतःचा विशिष्ट दृष्टीकोन असतो.
 
गोठवलेल्या भ्रूण हस्तांतरणाचा (FET) यशाचा दर किती आहे?
अलिकडच्या वर्षांत भ्रूण गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये कमालीची प्रगती झाल्यामुळे, FET उपचार पद्धतीत जिवंत जन्मदर, कमी गर्भपात आणि निरोगी मुलांचा जन्म होण्याची संभावना जास्त आहे. FET प्रक्रियेने IVF च्या ताज्या भ्रूण रोपणाच्या यशाचा दर ओलांडला आहे.
 
निष्कर्ष
वंध्यत्वाचा सामना करणे ही एक कठीण परिस्थिती असू शकते. मूल होण्याची प्रगल्भ इच्छा आहे, परंतु ते शक्य नसल्यामुळे, एकटेपणा आणि नैराश्य येऊ शकते. जेव्हा आपली सर्व मित्र त्यांच्या मुलांसोबत बाहेर वेळ घालवताना दिसतात तेव्हा निपुत्रीक जोडप्यांना आपल्या वंध्यत्व परिस्थितीबद्दल दुख वाटते. आता सर्वजण आपापल्या मुलांमध्ये व्यस्त झाले असल्याकारणामुळे, कोणालादेखील आता आपल्यासोबत बोलायला वेळ नाही किंवा त्यांना मुले आहेत म्हणून ते आपल्याला समजू शकणार नाही, असा गैरसमझ
निर्माण होऊ शकतो.
निपुत्रिक जोडप्यांना जीवनातील सर्वोत्तम आनंद आपण गमावत आहोत असे वाटणे स्वाभाविक आहे. अशावेळी तुमचे नातेसंबंध कितीही चांगले आणि सुखी असले तरी, एकाकीपणा आणि नैराश्याची भावना निर्माण होऊ शकते.
जर तुम्ही वंध्यत्वाचा सामना करत असाल तर फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर (FET) हा एक आश्वासक पर्याय आहे. याचा यशस्वी दर चांगला असून, इतर प्रजनन उपचारांपेक्षा FET खूपच कमी खर्चिक आहे. ज्यामुळे तुम्ही तुमची अशक्य वाटणारी गर्भधारणेची शक्यता शक्य करू शकता, शिवाय असे करताना अतिरिक्त चक्रांची आवश्यकता कमी करू करून, वेळ आणि पैसा देखील वाचवू शकता.
DR HRISHIKESH PAI

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

एलोवेरा जेलमध्ये कधीही मिसळू नये या 3 गोष्टी, त्वचेसाठी फायद्याऐवजी नुकसानदायक

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

पुढील लेख
Show comments