कोरोनाकाळात प्रत्येकजण रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. आरोग्यदायी फळं, भाज्या, चूर्ण यांचं सेवन मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. शरीराला आवश्यक असणारे घटक कोणते हे आपण जाणतो. पण रोजच्या आहारातल्या काही पदार्थांमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
कोणते आहेत हे पदार्थ? जाणून घेऊ.
* मिठाशिवाय अन्नपदार्थाला चव येत नाही. पण मिठाचा अतिवापर घातक ठरू शकतो. ठिामुळे उच्च रक्तदाबासारखे आजार जडू शकतातच शिवाय प्रतिकारशक्तीही कमी होते. यामुळे आपण वारंवार आजारी पडू शकतो. म्हणूनच आहारातलं मिठाचं प्रमाण नियंत्रणात असावं.
* चहा आणि कॉफीचं अतिसेवनही आरोग्याला मारक ठरू शकतं. यातील कॅफेनमुळे प्रतिकारक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
* अतिगोड खाण्यामुळे स्थूलपणा, मधुमेहासारखे आजार जडू शकतात. यासोबतच शरीराची रोगांशी लढण्याची क्षमताही कमी होते.
* एनर्जी ड्रिंक्समुळे इन्स्टंट एनर्जी मिळत असली तरी रोगप्रतिकारक क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. यातल्या काही घटकांमुळे प्रतिकारकशक्तीवर थेट परिणाम होतो. त्यामुळे घरगुती किंवा नैसर्गिक पेयांना प्राधान्य द्यायला हव.