Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Gut Feeling गट फीलिंग म्हणजे काय?

Gut Feeling गट फीलिंग म्हणजे काय?
Gut Feeling तुम्हाला कधी गट फीलिंग येते का? तुम्ही कधी विचार केला आहे की ही भावना का होते? पोटात एक छोटासा मेंदू आहे आणि त्यामुळेच तुम्हाला आतड्यांसंबंधीची अनुभूती येते असे सांगितले तर तुम्हाला कसे वाटेल.
 
वैज्ञानिक संशोधनानुसार आपल्या पोटात दुसरा मेंदू असतो ज्याला आंतरीक मज्जासंस्था (एनट्रेरिक नर्वस सिस्टम) म्हणतात. येथूनच इंग्रजीत 'गट फीलिंग' ही म्हण वारंवार वापरली जाते.
 
जेव्हा काही घडणार असल्यास तेव्हा तुम्हालाही पोटात काहीतरी जाणवतं का ? आपल्या पोटात एक न्यूरॉन प्रणाली आहे ज्यामध्ये न्यूरोट्रांसमीटर असतात जे पचन सुरळीत करण्याव्यतिरिक्त पोटात सामान्यपणे जाणवणाऱ्या हालचालीसाठी देखील जबाबदार असतात. या न्यूरॉन प्रणालीला दुसरा मेंदू देखील म्हणतात.
 
ओटीपोटात आढळणारा छोटा मेंदू, आपल्या डोक्यातील मेंदूसह, आपल्या मानसिक स्थितीवर प्रभाव पाडतो आणि त्याच वेळी आपल्याला अनेक रोगांपासून वाचवतो. शरीरातील या लहान मेंदूची भावनिक बाबींमध्ये किंवा निर्णय घेण्याच्या परिणामांमध्ये कोणतीही भूमिका नसते.
 
तरी सामान्य रुपात गट फीलिंग तेव्हा येते जेव्हा आम्हाला त्याबद्दल काही अनुभव असेल किंवा त्याविषयी काही आठवणी जुळलेल्या असतील. आता प्रश्न असा आहे की जेव्हा ही फीलिंग येते तेव्हा यावर निर्णय घ्यावे की नाही?
 
अनुभव- अनुभावाच्या आधारावर गट फीलिंगवर विश्वास करु शकता. एखाद्या प्रकरणात आपली गट फीलिंग योग्य ठरली असेल तर आपण भविष्यात देखील विश्वास करु शकता.
 
मोठे निर्णय घेताना - अनेकदा घर खरेदी करणे, विवाह करणे या सारख्या गोष्टींचा निर्णय घेताना गट फीलिंगवर विश्वास करणे अनेकदा योग्य ठरतं. रिसर्चप्रमाणे गट फीलिंगने निर्णय घेणारे अधिक आनंदी राहतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ITI Admission Schedule 2023 Timetable : आयटीआयसाठी प्रवेश जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया व अंतिम तारीख