Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

HPV लस, सर्व्हायकल कॅन्सर: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होणारे 3 लाख मृत्यू थांबणार? वाचा

HPV लस, सर्व्हायकल कॅन्सर: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होणारे 3 लाख मृत्यू थांबणार? वाचा
, शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (11:07 IST)
सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. हा महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात गंभीर कर्करोग असून या कर्करोगामुळे दरवर्षी 3,00,000 पेक्षा जास्त मृत्यू होतात.
 
पण हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय, तो किती धोकादायक असतो, त्याची लक्षणे काय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
 
एचपीव्ही संसर्गाच्या काही प्रकारांमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा बहुतेक एचपीव्ही-16 आणि 18 मुळे होतो.
 
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून महिलांचं संरक्षण करण्यासाठी भारतात प्रथमच क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लस उपलब्ध होणार आहे.
 
यासंबंधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की, सरकार देशातील 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस देण्याची योजना आखत आहे.
 
एका संशोधनात असं दिसून झालंय की, एचपीव्ही लस गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर 90% टक्के परिणामकारक ठरते.
 
या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी एचपीव्ही लस कसं काम करते?
 
एचपीव्ही लस नऊ प्रकारच्या एचपीव्हीपासून संरक्षण पुरवते.
 
त्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गुदद्वाराचा कर्करोग, जननेंद्रिय, डोके आणि घशाचा कर्करोग समाविष्ट आहे.
 
संशोधनात असं दिसून आलंय की, ही लस एचपीव्हीच्या संसर्गापासून कमीतकमी 10 वर्ष संरक्षण पुरवते. मात्र तज्ज्ञांच्या मते हे संरक्षण त्याहीपेक्षा जास्त काळ टिकण्याची शक्यता आहे.
 
सोबतच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये ही 90 % गुणकारी ठरत आहे.
 
एचपीव्ही लस कोणाला देता येते?
ही लस मुलामुलींना देता येते. मात्र एचपीव्हीच्या संपर्कात येण्याआधी ही लस घेतली पाहिजे.
 
कारण ही लस केवळ संसर्ग टाळू शकते. एकदा का या विषाणूची लागण झाली तर या लशीचा फारसा उपयोग होत नाही.
 
हा विषाणू इतक्या वेगाने पसरतो की मुलांनी लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधीच त्यांना लसीकरण करणं गरजेचं आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सामान्य व्यक्तीला या लशीचे एक किंवा दोन डोस पुरेसे आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना मात्र दोन किंवा तीन डोस द्यावेत असं संघटना सांगते.
 
एचपीव्ही म्हणजे काय?
एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे.
 
एचपीव्हीचे 100 पेक्षा जास्त प्रकार असून संक्रमणांमुळे सहसा कोणतीही लक्षणे उद्भवत नाहीत. मात्र काही प्रकारात अंगावर चट्टे उठू शकतात. हे चट्टे हातावर, पायावर, गुप्तांगांवर किंवा तोंडाच्या आत दिसू शकतात.
 
बहुतेक लोकांना याचा संसर्ग झाल्याचे लक्षात येत नाही. आणि कधीकधी तर उपचारविनाच हा संसर्ग बरा होतो.
 
दुसरीकडे, एचपीव्हीमुळे ऊतींची जास्त वाढ होऊन कर्करोग होऊ शकतो.
 
एचपीव्ही कोणाला होतो आणि तो लैंगिकरित्या संक्रमित होतो का?
 
तर हा खूप संसर्गजन्य आजार आहे. एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या त्वचेच्या संपर्कात आल्यास हा आजार पसरतो.
 
80% लोकांना वयाच्या पंचविशीपर्यंत एचपीव्हीची लागण होते.
 
बहुतेक प्रकरणांमध्ये लोक 18 महिने ते दोन वर्षांपर्यंत संक्रमित असतात.
 
लहान वयात लैंगिक संबंध ठेवल्यास, कमी वयात गरोदर राहिल्यास, अनेक जोडीदारांसोबत लैंगिक संबंध ठेवल्यास, गुप्तांगाची स्वच्छता नसल्यास एचपीव्हीची लागण होते.
 
कमकुवत रोगप्रतिकार शक्ती, धूम्रपान, एचआयव्ही/एड्स, क्लॅमिडीया सारख्या लैंगिक संक्रमित संसर्गासारखे इतर घटक देखील एचपीव्हीची संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात
 
जगभरात एचपीव्हीची लस किती व्यापक आहे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळजवळ 90% मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.
 
अशा देशांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे लवकर लक्षात येत नाही.
 
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे, 2030 पर्यंत एचपीव्हीचे 90 टक्के लसीकरण पूर्ण करून येत्या शतकात हा आजार हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे.
 
जवळपास 140 देशांनी आता एचपीव्हीचे लसीकरण सुरू केले आहे.
 
महिलांमध्ये या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण सब-सहारा आफ्रिकेत (24%) आढळते. त्यानंतर लॅटिन अमेरिका, कॅरिबिया (16%), पूर्व युरोप (14%) आणि दक्षिण पूर्व आशिया (14%) चा क्रमांक लागतो.
 
स्क्रीनिंग आणि लसीकरण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्याचे दोन प्रभावी मार्ग आहेत.
 
लसीकरण मोहीम सुरू करणारा रवांडा हा आफ्रिकेतील पहिला देश होता. 2011 मध्ये मुलींना लवकरात लवकर लसीकरण करून महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाची तपासणी सुरू करण्यासाठी त्यांनी एक योजना सुरू केली.
 
या कर्करोगापासून बचाव करण्याबाबत जागरूकता खूपच कमी आहे. 10% पेक्षा कमी महिलांची तपासणी केली जाते. कर्करोगाची लक्षणे नसतानाही स्क्रीनिंग आवश्यक असते.
 
ही लस गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये यासाठी संरक्षण पुरवत असेल तरी ती सर्व प्रकारच्या एचपीव्ही पासून संरक्षण करत नाही.
 
म्हणूनच महिलांनी 25 वर्षांचे झाल्यावर पॅप स्मीअर चाचणी करून घेतली पाहिजे जेणेकरून कर्करोगपूर्व अवस्थेचा शोध लावला जाऊ शकतो.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mixed Fruit Juice Side Effects: सर्व फळांचा एकत्रित रस सेवन केल्याने होणारे नुकसान