Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

या लक्षणांमुळे ओळखा आपली इम्युनिटी कमकुवत तर नाही.

या लक्षणांमुळे ओळखा आपली इम्युनिटी कमकुवत तर नाही.
, बुधवार, 31 मार्च 2021 (09:15 IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांना काळजीत टाकणारे झाले आहे. कोरोनाला टाळण्यासाठी आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यासाठी गरमपाणी पिणे, व्हिटॅमिन सी,डी,घेणं या सारखे प्रयत्न सुरु आहेत. आपली प्रतिकारक शक्ती बळकट आहे किंवा नाही हे या लक्षणांमुळे ओळखू शकता.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* वारंवार आजारी होणं -हवामान बदल झाल्यामुळे सर्दी पडसं आणि ताप येणं कमकुवत प्रतिकारक शक्ती दाखवते.रोग प्रतिकारक कमकुवत झाल्यामुळे शरीर विषाणू आणि बेक्टेरिया शी लढू शकत नाही. हवामानाच्या बदल मुळे लोकांना त्रास होतात. अशा परिस्थितीत कोरोनाने संसर्ग होण्याचा धोका जास्त होतो . 
 
* शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होणं- आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता प्रतिकारक शक्तीला कमकुवत करते. थकवा येणं, शरीरात वेदना होणं देखील आपली प्रतिकारक शक्ती कमकुवत दर्शवते. जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे तर कोरोनाकाळात विशेष सावधगिरी बाळगावी .
 
* जखम भरण्यात वेळ लागते- आपल्या शरीरात जखम झाली असल्यास ते भरायला वेळ लागते. जखम लवकर भरत नसेल तर त्याचा अर्थ आहे की आपले शरीर संसर्गापासून लढण्यास सक्षम नाही. आपली प्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे संकेत असू शकतात. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेकअप सामान खराब झाले असल्यास अशा पद्धतीने वापरा