Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय स्त्रियांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण : फ्रीजमधील वस्तु लवकर वापरुन संपवा

Webdunia
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (12:57 IST)
काही काही गोष्टींचा अर्थाअर्थी काहीच संबध नसतो. पण सत्य विलक्षणच असतं.
आता हेच पहा. आजकाल आपल्या आजूबाजूला आपल्या ओळखीचे कॅन्सरचे बरेचसे पेशंट आपल्याला दिसतात. त्यातही पोटाच्या कॅन्सरचे. यात एकाएकी वाढ कशी होते याचा अभ्यास करताना काहीच संबंध नसलेली एक गोष्ट समोर आली आणि डोके चक्रावलं. स्वतःच्याच संशोधनावर विश्वास बसेना. असंही असू शकतं?
 
फ्रीजमधील वस्तूंचा आणि कॅन्सरचा काय संबंध?
पण आहे. चिंचेपासून चिकनपर्यंत, मिरच्यांपासून मटणापर्यंत, साबुदाण्यापासून सोयासॉसपर्यंत पीठ, पोहे, रवा, लोणचे, पापड, दूध, दही भाजीपाला जे असेल ते कोंबा फ्रीजमध्ये, ही महिलांची वृत्ती. इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळं, कालची शिल्लक राहिलेली डाळ, दोन दिवसांपूर्वीची राहिलेली मसालावाटण करून शिजवलेली भाजी, सर्व प्रकारची कडधान्ये, अंडी, वेगवेगळी मसाला पाकीटं तीही उघडी, एक ना धड भाराभर वस्तू!
सर्वसाधारण घरात दोन वयस्कर सोडले, तर वर्ष दोन वर्षांच्या अंतरानी मुलगा सून किंवा मुलगी जावई येतात. तेही काहीच दिवसांकरता. 
जास्त पाहुणे आले तर आपण एकतर बाहेरुन मागवतो नाही तर त्यांनाच हॉटेलमध्ये घेऊन जातो. दोन व्यक्तींना असं किती लागतं? आजकाल पावलोपावली सुपर मार्केटे आहेत. एका फोनवर माल घरपोच मिळतो. मग कशाला प्रत्येक वस्तूचा जास्त साठा करून ठेवता? म्हणे बाहेर ठेवले तर कीड लागते..
 
या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे. कॅन्सरचे विषाणु येथेच तयार होत आहेत. अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. पण 1000 व्यक्तींचा अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील 538 जणांना कॅन्सरची लागण झाली असून, यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे आणि आश्चर्य म्हणजे या 538 ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार चालू होता.
 
फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, लागते तेवढेच आणा.
मटण चिकन मेरीअनेट करण्यापुरतं.. आठ आठ दिवस नाही. चणाडाळीचं पीठ, जोंधळा पीठ, कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा. भाजी दोन दिवसात संपेल एवढीच. दूध 48 तासात वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या.
 
साभार : डॉ. मकरंद करमरकर
टाटा मेमोरियल होस्पिटल
मुंबई 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात तिळाचे सेवन केल्याचे फायदे जाणून घ्या

ओठांचे सौंदर्य वाढवा या टिप्स अवलंबवा

दिवाळीनंतर, हे 5 आरोग्यदायी ड्रिंक्स प्या शरीराला डिटॉक्स करा

पार्टनर योग्य आहे की नाही असे ओळखा

पंचतंत्र : बेडूक आणि सापाची गोष्ट

पुढील लेख
Show comments