Dharma Sangrah

सकाळची न्याहारी किती आवश्यक आहे !

Webdunia
गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (15:15 IST)
सकाळचा न्याहारी शरीरासाठी किती आवश्यक आहे, हे सर्वजण जाणत असूनही अनेक लोक सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पडतात. त्याचे दुष्परिणाम मग त्यांच्या शरीरावर होतात. 
 
सकाळचा नाश्ता निरोगी राहण्यासाठी फार महत्वाचा आहे. नाश्ता शरीरात उर्जा निर्माण करतो. नाश्ता करणारे लोक नाश्ता न करणार्‍या लोकांपेक्षा अधिक धडधाकट असतात. सकाळी उठल्यानंतर एक तासात नाश्ता करायला हवा. नाश्ता केल्याने मेंदूला चालना मिळते व एकाग्रता वाढायलाही मदत होते. शाळा-कॉलेजांत जाणारी बरीचशी मूल जी नाश्ता करत नाही, त्यांच लक्ष्य अभ्यासात केंद्रित होत नाही. पण समतोल नाश्ता घेतला तर अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. 
 
सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, खनिज, व्हिटॅमिन, फायबर, कार्बोहायड्रेट इत्यादी घटकांचा समावेश करा. नाश्त्यामध्ये भाज्या, फळं, दुध, मोड आलेले कडधान्य, पनीर, दही, सालीच्या डाळी इत्यादींचा समावेश करा. तसेच संमिश्र भाज्या मिळवलेले पोहे, ओट्स, उपमा, दालिया, चीलाल चपाती, इडली, उकडलेले अंडे इत्यादी घेऊ शकता. 
 
सकाळचा नाश्ता केल्यास हृदयरोग, अल्सर, मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

ही योगासने तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढवतील

अकबर-बिरबलची कहाणी : क्षणिक आनंद

Easy Tips काळे पडलेले पैंजण चकचकीत करण्यासाठी सोप्या टिप्स

विरजण न वापरता दही लावण्याच्या पद्धती

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 5 घरगुती पेय; आरोग्यासाठी फायदेशीर

पुढील लेख
Show comments