Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चमचाभर साखर कमी करू शकते वृद्धांची विस्मृतीची समस्या

चमचाभर साखर कमी करू शकते वृद्धांची विस्मृतीची समस्या
, रविवार, 5 ऑगस्ट 2018 (00:59 IST)
म्हातारपणी जे लोक कमजोर स्मृतीची शिकार ठरतात व छोट्यामोठ्या गोष्टी विसरतात, त्यांच्यासाठी एक चमचा साखर लाभदायकठरू शकते, असा खुलासा एका ताज्या अध्ययनातून झाला आहे. त्यामुळे त्यांची स्मृती वाढू शकते. ज्यावेळी आपल्या पाण्यामध्ये थोडी साखर मिसळून पितो, तेव्हा आपला मेंदू आधीच्या तुलनेत जास्त कठोर मेहनत करू लागतो. एवढेच नाही तर वृद्ध लोक साखरेचे सेवन केल्यानंतर स्वतःला जास्त खूश समजतात व त्यांची स्मृतीही चांगली होते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, समजा आपल्या शरीरात मेंदूसाठी जास्त ऊर्जा उपलब्ध झाली तर आपल्याला जास्त मेहनत घेण्यास प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे आपला आत्मविश्र्वास अधिक चांगला होईल व आपले मानसिक प्रदर्शनही उत्तम होईल. युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविकच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांच्या दाव्यानुसार, या अध्ययनाचे निष्कर्ष जे वृद्ध आपल्या मेंदूचे प्रदर्शन चांगल्या प्रकारे होण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यांच्यासाठी कमी लाभदायक ठरू शकतात. साखरेचे थोडेसे प्रमाण 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा मूड चांगला करून स्मृती सुधारण्यास मदत करतो. या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी काही वृद्धांना साखरमिश्रीत पेय पिण्यासाठी दिले व त्यानंतर त्यांना बौद्धिक काम दिले. हे पेय पिणार्‍या वृद्धांची स्मृती सुधारली व त्यांचा मूडही चांगला झाला. यामुळे त्यांची एकाग्रताही वाढल्याचे दिसून आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गार्लिक चिकन