Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ठेवा

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ठेवा
, शनिवार, 15 मे 2021 (19:23 IST)
कोरोना विषाणूच्या साथीच्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली होती. लोक या आजाराला घाबरत होते. 
देशभरातील लॉकडाऊनमधील लोकांनी स्वेच्छेने कोविड नियमांचे पालन केले पण जेव्हा पुन्हा एकदा लॉकडाउन लावला लोकांनी त्याच्या कडे दुर्लक्ष केले आहे. असं म्हणतात की केलेल्या ऐका चुकीची माफी मिळू शकते परंतु पुन्हा पुन्हा तीच चूक करणे चुकीचे आहे. कोरोनासह आपली जीवनशैली देखील बदलायला पाहिजे. हे फार महत्त्वाचे आहे.  
 
आपल्या जीवनशैलीत काही गोष्टी कशा काळजी घ्याव्यात ते जाणून घेऊया-
 
1 मास्कचा वापर,सामाजिक अंतर राखणे,हाताला वारंवार धुणे सुरु ठेवा. बाहेरून आल्यावर अंघोळ करा. कपड्यांना डेटॉलच्या पाण्याने धुवावे. 
 
2 हिरव्या पाले भाज्या, फळे खाणे चालू ठेवा. पौष्टिक गोष्टी बर्‍याचदा आवडत नाहीत पण आरोग्यासाठी त्या फायदेशीर असतात.
 
3 बाजारात जाताना मास्क लावून बाहेर जा. वर्दळीच्या ठिकाणी जाणे टाळा. आपल्या सह सेनेटाईझरची बाटली जवळ ठेवा. 
 
4 बाहेरचे काहीही खाणे टाळा.
 
5 योग, प्राणायाम करा. यामुळे ऑक्सिजनची पातळी चांगली होते. याला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा.
 
6 दररोज सकाळी कोमट पाणी प्या आणि मिठाच्या पाण्याचे गुळणे करत राहा.
 
7 निरोगी आहाराचे अनुसरण करा. प्रथिनेयुक्त पदार्थ खा.
 
8 घरामध्ये पार्लरशिवाय आपण ज्या प्रकारे आपल्या शरीराची काळजी घेत आहात त्या प्रकारे काही काळ ही सवय लावून घ्या.
 
9. रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय कमी करा आणि कमीतकमी 7 तास झोप घ्या.
 
10. लॉकडाऊन दरम्यान, आपण चांगल्या जीवनशैलीसाठी बनविलेले नियम चालू ठेवा.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या