Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेरेब्रल पाल्सी असलेल्या 3 वर्षाच्या मुलावर सेल-बेस थेरपीने यशस्वी उपचार

Webdunia
बुधवार, 14 जून 2023 (13:40 IST)
मुंबई: डॉ. प्रदीप महाजन, रीजनरेटिव्ह मेडिसिन संशोधक आणि स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन्स – इंडियाचे संस्थापक यांच्या नेतृत्वाखालील टीमने सेरेब्रल पाल्सी असलेल्या ३ वर्षाच्या मुलावर सेल-आधारित थेरपीद्वारे यशस्वी उपचार केले. झांबियातील क्रिस्टीयन झिम्बा काही महिन्यांचा असताना त्याला सेरेब्रल पाल्सी आढळून आला ज्यामध्ये त्याच्या गळ्यात गुंडाळलेल्या दोरीचा समावेश होता, त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा काही काळासाठी प्रभावित झाला आणि मेंदूच्या काही भागांचे नुकसान झाले याकारणाने बाळाच्या विकासातही विलंब झाला. क्रिस्टीयन अगदी लहानपणापासूनच अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी  रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. महाजन यांच्याकडे धाव घेतली.
 
डॉ. प्रदीप महाजन, रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन्स इंडियाचे संस्थापक सांगतात की, सेरेब्रल पाल्सी ही मानसिक आणि शारीरिक विकासावर परिणाम करणारी स्थिती असून क्रिस्टीयनच्या विकासात्मक वाढीवर त्याचा परिणाम दिसून आला. डोळ्यांच्या कमकुवत स्नायूंमुळे त्याची दृष्टी क्षीण झाली, स्नायू कमकुवत झाल्यामुळे आधाराशिवाय बसता येत नव्हते. अन्नाचे सेवन करणे आणि गिळणे यासारख्या दैनंदिन कामांमध्येही त्याला अडचणी येत होत्या. क्रिस्टीयनचा प्रवास दिवसेंदिवस खडतर होत चालला होता. क्रिस्टीयनवर केले जाणारे उपचार, त्यासंबंधीची योजना ही त्याच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली होती. यामध्ये बोन मॅरो एक्सट्रॅक्ट, क्वांटम एनर्जी मेडिसिन, वाढीचे घटक, नेब्युलायझेशन आणि औषधे यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, त्याला टार्गेट ओरीएंटेड स्टीम्युलेशन आणि स्नायू-मजबूत करणारे व्यायाम यावरही भर देण्यात आला.त्याचे स्नायूवरील नियंत्रण आणि एकूण शारीरिक विकासात प्रगती दिसून आली. कमकुवत स्नायूवर उपचार करुन त्यांना बळकटी आणने  हा देखील उपचाराचाच एक भाग होता असे डॉ. महाजन यांनी स्पष्ट केले.
 
दिवसेंदिवस क्रिस्टीयनकडून उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला. त्याचे स्नायूंवरील नियंत्रण आणि सामर्थ्य लक्षणीयरीत्या सुधारले ज्यामुळे स्नायु बळकट होऊ लागले. याच्या प्रवासातील एक उल्लेखनीय बदल म्हणजे तो डोळ्यांच्या संपर्काने संवाद साधण्याचा प्रयत्न करु लागला होता. क्रिस्टीयनच्या जीवनाच्या गुणवत्तेत उल्लेखनीय परिवर्तन दिसून आले. त्याच्या स्नायूंच्या वस्तुमानात सुधारणा झाली. त्याच्या शरीरावरील ताण कमी झाला. याव्यतिरिक्त लाळ गळणे थांबले तसेच त्याच्या पायातील कमकुवतपणा हळूहळू दूर होऊ लागला. क्रिस्टीयन झिम्बाचा अतुलनीय प्रवास प्रत्येक व्यक्तीमध्‍ये ‍ असलेल्या विलक्षण सामर्थ्याची जाणीव करून देणारा असून तो इतर रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

एलोवेरा जेलमध्ये कधीही मिसळू नये या 3 गोष्टी, त्वचेसाठी फायद्याऐवजी नुकसानदायक

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

पुढील लेख
Show comments