आरोग्य ही संपत्ती आहे, आरोग्याचे महत्त्व ओळखून जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. त्याचं वर्धापन दिन म्हणून दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य दिनाच्या माध्यमातून जगाला अनेक घातक आजारांपासून वाचवण्यात आले आहे. यानंतरही आज विविध धोकादायक आजार होण्याची शक्यता आहे. जनजागृतीची गरज असून जागतिक आरोग्य दिनाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचा हा प्रयत्न आपले जग रोगमुक्त करेल.
दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखली कू करत आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी लिहिले आहे की आनंदी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आरोग्य आवश्यक आहे. शाररिक व मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान देतात. म्हणूनच आपले आरोग्य जपण्यासाठी आपण सजग राहूयात. सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.