Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Immunity स्ट्रॉग आहे की नाही, लक्षणे जाणून घ्या

Immunity स्ट्रॉग आहे की नाही, लक्षणे जाणून घ्या
, गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (09:58 IST)
कोरोना महामारी काळात ज्या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधलं ते म्हणजे इम्यूनिटी अर्थात रोग प्रतिकारक शक्ती. आमची इम्यूनिटी व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस सारख्या टॉक्सिन्सला लढा देते आणि आम्हाला सर्दी, खोकला सारख्या व्हायरल संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करते. आमची इम्यूनिटी स्ट्रॉग असल्यास लंग्स, किडनी आणि लिव्हर संक्रमण तसेच इतर आजरांपासून बचाव होतो. 
 
कोरोना संसर्गाच्या सुरुवाती काळापासूनच ऐकण्यात येत आहे की इम्यूनिटी कमजोर असल्यास संक्रमणाचा धोका अधिक असेल. 
 
खरं तर आमच्या जवळपास अनेक प्रकाराचे संक्रामक तत्व किंवा एलर्जी पैदा करणारे तत्व आमच्या आरोग्याला नुकसान करणारे असतात. कळत-नकळत आमच्या आहारात सामील असतात. प्रदूषणामुळे श्वास घेताना देखील वार्‍याने हे नुकसान करणारे तत्व आम्ही अवशोषित करतो. तरी आजाराला बळी पडत नाही तर त्याचे कारण आहे की आमचं Immunity सिस्टम मजबूत असणे.
 
या उलट ज्याचे इम्यून सिस्टम कमजोर असतं त्यांना वातावरणात बदल, एलर्जी इतर सहन होत नाही आणि अशा परिस्थितीत ते आजारी होतात. तसं तर रक्त तपासणीद्वारे देखील इम्यूनिटीबद्दल माहीत पडू शकतं परंतू इम्यून सिस्टम कमजोर असल्यावर शरीर स्वत: संकेत देतं.
 
आपण लागोपाट आजारी राहत असाल किंवा विपरित परिस्थितीत दुसर्‍यांच्या अपेक्षा लवकर आजरी पडत असाल तर आपली इम्यूनिटी कमजोर आहे समजावे. 
 
वातावरणात, आहारात जरा बदल झाल्यावर आपल्या सर्दी-खोकला, घसा खराब होणे, थकवा जाणवणे, एखादी जखम लवकर न भरणे इतर कमजोर इम्यूनिटीचे लक्षणं आहेत.
 
कमजोर इम्यून सिस्टममुळे शरीरावर डाग पडणे, हिरड्‍यांवर सूज, तोंडात छाळे, यूटीआय, अतिसार, किंवा झोप न येणे, डिप्रेशन, डार्क सर्कल इतर लक्षणे दिसून येतात. 
 
अशात आपली काळजी घेणे आवश्यक आहे तसेच संतुलित आहारात घेऊन इम्यून सिस्टम मजबूत करण्याची गरज आहे. व्हिटॅमिन डी इम्यूनिटी मजबूत करतं. 
 
अनेक लोकांमध्ये याची कमतरता आढळून येते. आणि याचं सर्वात सोपं स्त्रोत आहे सूर्य प्रकाश.
 
याप्रकारे आपल्या दिनचर्या आणि आहाराकडे लक्ष देऊन आपल्या तब्येती काळजी स्वत: घेणे आरोग्यासाठी उत्तम ठरेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एमबीए नंतरच्या संधी