Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाची 5 नवी लक्षणं, घाबरु नका पण दुर्लक्षही करु नका

Webdunia
गुरूवार, 22 एप्रिल 2021 (08:08 IST)
देशात कोरोनाने पुन्हा थैमान मांडला आहे आणि दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नवीन स्ट्रेन आल्याने लक्षणं देखील बदलली आहेत. शरीरातील काही बदल संकेत देतात अशात माहित असावं की हे बदल कोणते आहेत ते. अनेकांना कोरोना असून चाचणी नॅगेटिव्ह येत आहे तर काही पॉझिटिव्ह होऊन गेलं तरी त्यांच्या लक्षात आले नाही. गेल्या वर्षी सर्दी-खोकला, ताप, घसा खवखणे इतर लक्षणं दिसून आली तर इतर लक्षण काय आहेत जाणनू घ्या-
 
ही आहेत कोरोनाची नवी लक्षणं
 
डोळे लाल होणे
जास्त वेळ स्क्रीन बघितल्याने देखील डोळे लाल होतात परंतू कोरोना संसर्ग झाल्यास डोळे लाल होण्यासह डोकेदुखी आणि ताप ही लक्षणंही दिसून येतात. 
 
थकवा
दररोजच्या कामाचा थकवा वेगळा परंतू अतिशय थकवा येणं हेही कोरोनाचे लक्षण असू शकते. जास्त दिवस सतत थकवा जाणवत असेल अगदी लहान-सहान कामं करणे देखील अवघड होत असेल‍ किंवा शरीर वेदना हे कोरोनाचे संकेत असू शकतात.
 
लूज मोशन
सतत दोन-तीन ‍दिवस लूज मोशन होणे हे देखील संकते असू शकतात. पचनसंस्थेवर परिणाम होऊन डायरिया, मळमळणे, भूक न लागणं अशी लक्षणं संकेत असू शकतात.
 
मेमरी डिसऑर्डर
स्मरणशक्तीवर परिणाम होणे अर्थात एकाग्रतेच कमी, अस्वस्थ जाणवणे, निर्णय घेण्याची क्षमते गोंधळ, विसर पडणे अशी काही लक्षणं कोरोनाच्या संसर्गामुळेही असू शकतात.
 
श्वासाचा त्रास
श्वास घेण्यास त्रास होणं ही कोरोना व्हायरसबाबत गंभीर समस्या दिसून आली आहे. छातीत जडपणा जाणवणे हे कोरोना संक्रमणाचे संकेत ठरू शकतात.
 
डॉक्टरांच्यामते अशा परिस्थितीत असे ही घडले असू शकतात की व्यक्तीला यापैकी काही लक्षणं गंभीर वाटत नसावे म्हणून त्यांनी चाचणीच करवली नाही ते आपोआप रीकव्हर देखील झाले असावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

International Day of Families Wishes in Marathi जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा

मुलांसाठी खास बनवा आंबट-गोड पास्ता रेसिपी

उन्हाळ्यात या भाज्या खाणे टाळा

बारावी नंतर समाजशास्त्रात BA करायचे असेल तर कोणते विषय घ्यावे लागतील जाणून घ्या

Hair Care:स्प्लिट एंड्सची समस्या असेल तर घरीच हे उपाय करा

पुढील लेख