Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी झाल्याची 5 लक्षणे

Webdunia
मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (08:12 IST)
पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी झाल्यावर काही लक्षणे दिसून येतात तर चला जाणून घेऊया या लक्षणांबद्दल विस्तृतपणे-
 
सध्या पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या झपाट्याने वाढत आहे. शुक्राणूंची संख्या कमी होणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. वैद्यकीय भाषेत याला ऑलिगोस्पर्मिया म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, निरोगी पुरुषाच्या 1 मिली वीर्यमध्ये किमान 15 दशलक्ष शुक्राणू असणे आवश्यक आहे. जर तुमच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या खूपच कमी असेल तर ती गंभीर बाब आहे. शुक्राणूंची संख्या कमी असल्यामुळे पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसणे, गर्भधारणेमध्ये अडचण आणि लवकर पतन यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशात, या समस्येवर लवकरात लवकर उपचार करणे खूप महत्वाचे आहे. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी झाल्यामुळे अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात.
 
चिन्हे ओळखा
स्पर्म काउंट कमी असल्याने पुरुषांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. इच्छा कमी होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन, लवकर पतन आणि कार्यक्षमतेत घट ही तुमच्या शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याची चिन्हे आहेत. अशात तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
गर्भधारणा करण्यात अडचण
पुरुषांमध्ये वंध्यत्व किंवा गर्भधारणा करण्यात अडचण हे देखील शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे लक्षण असू शकते. एक वर्ष नियमित संबंध ठेवूनही जर तुमची पत्नी गर्भधारणा करू शकत नसेल, तर हे शुक्राणूंची संख्या कमी झाल्याचे लक्षण असू शकते. मात्र गर्भधारणा न होण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. अशात आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा.
 
अंडकोषांमध्ये वेदना किंवा सूज
अंडकोषांमध्ये दुखणे किंवा सूज येणे हे शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे लक्षण असू शकते. याशिवाय अनेक पुरुषांना अंडकोषाच्या भागात ढेकूळ जाणवू शकते. जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
 
अती थकवा
पुरुषांमध्ये जास्त थकवा हे शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे लक्षण असू शकते, जर चांगला आहार आणि पुरेशी विश्रांती असूनही, तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तपासणी करून घ्यावी.
 
शरीर किंवा चेहर्यावरील केस गळणे
जर एखाद्या पुरुषाच्या शरीरावर, चेहऱ्यावर किंवा इतर भागांवर केस कमी होत असतील तर हे शुक्राणूंची संख्या कमी झाल्याचे लक्षण असू शकते. ही लक्षणे टेस्टोस्टेरॉन आणि इतर हार्मोन्सचे असंतुलन दर्शवू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास, आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
अस्वीकरण: येथे सादर केलेला मजकूर केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही सल्ला किंवा माहिती अमलात आणण्यापूर्वी कृपया तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

शिल्लक राहिलेल्या सोनपापडी पासून बनवा गोड पुरी

मुक्त संवाद तर्फे इंदुरात म.प्र. मराठी साहित्य संमलेन आणि दिवाळी अंक व मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन

दुधी भोपळ्याचा डोसा रेसिपी

हिवाळ्यात तिळाचे सेवन केल्याचे फायदे जाणून घ्या

पोलीस भरतीची तयारी कशी करावी

पुढील लेख
Show comments