Publish Date: Wed, 11 Nov 2026 (15:32 IST)
Updated Date: Wed, 11 Nov 2026 (15:35 IST)
हिवाळ्यात अनेकदा तहान कमी लागल्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते आणि डिहायड्रेशन होऊ शकते. अशा वेळी नारळ पाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते.
हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे प्रमुख फायदे
शरीर हायड्रेटेड ठेवते: हिवाळ्यात हवा कोरडी असल्याने त्वचा आणि शरीर लवकर शुष्क होते. नारळ पाणी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास आणि नैसर्गिक हायड्रेशन देण्यास मदत करते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते: नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे हिवाळ्यात होणारे सर्दी, खोकला आणि संसर्ग दूर ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.
त्वचेचा कोरडेपणा दूर करतो: थंड हवेमुळे त्वचा कोरडी आणि रुक्ष पडते. नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचेला आतून पोषण मिळून नैसर्गिक चमक येते.
पचनक्रिया सुधारते: हिवाळ्यात जड किंवा तेलकट पदार्थ जास्त खाल्ले जातात. नारळाच्या पाण्यातील फायबर आणि एन्झाईम्स पचन सुलभ करतात आणि अपचन, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता टाळतात.
इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन: नारळ पाणी हे एक नॅचरल एनर्जी ड्रिंक आहे. यातील पोटॅशियम आणि सोडियम शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखतात, ज्यामुळे हिवाळ्यात येणारा सुस्तपणा दूर होऊन ताजेतवाने वाटते.
ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते: हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे काहींचा रक्तदाब वाढतो. नारळाच्या पाण्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
हिवाळ्यात नारळ पाणी पिताना घ्यायची काळजी
वेळ: नारळ पाणी नेहमी सकाळी किंवा दुपारी प्यावे. संध्याकाळी किंवा रात्री पिणे टाळावे, कारण याची तासीर थंड असते.
नॉर्मल तापमानावर प्या: फ्रीजमध्ये ठेवलेले थंड नारळ पाणी पिऊ नये.
सर्दी असल्यास टाळा: तुम्हाला आधीच खूप जास्त सर्दी, कफ किंवा सायनसचा त्रास असेल तर नारळ पाणी पिणे टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.