Publish Date: Fri, 11 Jan 2019 (17:19 IST)
Updated Date: Sat, 12 Jan 2019 (14:06 IST)
सध्या बऱ्याच ठिकाणी तीव्र थंडी आहे. अशा परिस्थितीत, लोक सकाळी उशीरा उठतात आणि नाश्ता केल्याशिवाय ऑफिसमध्ये जातात. कदाचित त्यांना या गोष्टीची कल्पना नसते की सकाळी नाश्ता न घेतल्याने आपल्याला थकवा आणि तणाव अनुभवू लागतो. अशामध्ये जर आपण सकाळी उशीरा उठलो तर फक्त थोडेसे अन्नाचे सेवन करून आपण हिवाळ्याचे आजार टाळू शकता. सकाळी नाश्त्यात जर आपण अधिक फळे आणि सलाड खाल्ले तर आपला इम्यून सिस्टम मजबूत राहतो आणि आपण रोगमुक्त होऊ शकता. जेव्हा आपले पोट रिकामं असतं मग त्या वेळी आपल्या शरीरात गामा इंटरफेरॉन नावाचा एंटी-व्हायरल एजंट 17 टक्के घटतो, ज्यामुळे आपल्या शरीरात अधिक तणाव निर्माण होतो आणि आपण सहजपणे सर्दीला बळी पडतो.
अशामध्ये हे टाळण्यासाठी आहारात फळं, भाज्या आणि डाळींचा समावेश केला पाहिजे. हे आपल्या शरीराला घातक रोगांविरुद्ध लढण्यास मदत करतात. जर आपल्याला मांसाहारी असाल तर हिवाळ्यात, आपल्या आहारात अंडी आणि मासे यांचा समावेश केले पाहिजे. त्याच वेळी, दररोज सकाळी, व्यायाम केल्याने आपले इम्यून सिस्टम व्यवस्थित काम करतो. व्यायाम करणारे लोकं अधिक सक्रिय असतात. सर्दी टाळण्यासाठी दररोज ग्रीन-टीचे सेवन केले पाहिजे.