Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Cucumber Benefits And Side Effects काकडी खाण्याचे फायदे आणि तोटे

Cucumber Benefits And Side Effects काकडी खाण्याचे फायदे आणि तोटे
, बुधवार, 9 मार्च 2022 (08:03 IST)
अशा वेळी काकडी खाणे घातक ठरू शकते! काकडी खाण्याची योग्य वेळ जाणून घ्या
काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोकं जेवणासोबत सॅलडमध्ये काकडी खातात. काकडीला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे पॉवरहाऊस म्हटले जाते. मात्र, काकडी कधी आणि कशी खावी, याबाबत अनेकांना माहिती नसते. काकडी नेहमी दिवसा खावी असे म्हणतात. दुपारी काकडी खाल्ल्याने जास्तीत जास्त फायदा होतो. रात्रीच्या वेळी काकडीचे सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. जाणून घ्या काकडी खाण्याचे कोणते फायदे आणि तोटे आहेत.
काकडीचे फायदे
वजन कमी करण्यासाठी काकडी हा एक चांगला पर्याय आहे. काकडी खाल्ल्याने पोटही भरते आणि तुम्हाला भरपूर पोषक तत्वेही मिळतात. काकडीत 95 टक्के पाणी असते, जे चयापचय मजबूत करते.
काकडी खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते. काकडीत व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन यांसारखे अँटीऑक्सिडंट आढळतात. त्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स निघून जातात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की रोज काकडी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. काकडीत आढळणारे प्रोटीन्स आपल्या शरीरात कॅन्सरशी लढण्याची ताकद देतात. काकडी आपल्या शरीरातील कॅन्सर किंवा ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करते.
काकडी सालीसकट खाल्ल्यास हाडांना फायदा होतो. काकडीच्या सालीमध्ये सिलिका असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. याशिवाय काकडीत आढळणारे कॅल्शियम हाडांसाठीही चांगले असते.
 
रात्री काकडी खाण्याचे नुकसान
ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी रात्री काकडी खाणे टाळावे. काकडीत कुकरबिटा सीन असतो, जे पचवण्यासाठी पचनशक्ती मजबूत असणे खूप महत्त्वाचं असतं.
रात्री काकडी खाल्ल्याने पोटात जडपणा येऊ शकतो. काकडी रात्री पचायला जड जाते. काकडी पचायला वेळ लागतो, त्यामुळे तुम्हाला जडपणा जाणवू शकतं.
रात्री काकडी खाल्ल्यानेही झोप खराब होऊ शकते. काकडीत जास्त पाणी असते त्यामुळे पोटात जडपणा येतो आणि झोपायला त्रास होतो. रात्री काकडी खाणे पचनासाठी देखील अयोग्य ठरतं.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योगासन : ताडासन योग रक्ताभिसरण वाढवण्यासाठी फायदेशीर