Daily Horoscope
✕

Custard Apple सीताफळ कोणी खाऊ नये

Webdunia
सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (13:59 IST)
Custard Apple Side Effects सीताफळ हे पौष्टिक गुणधर्मांचा खजिना आहे. आहारात याचा समावेश केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात, कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असतात. सीताफळमुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
 
सीताफळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे आणि फायबरसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे हे गर्भवती महिलांसाठी चांगले मानले जाते. सीताफळाचे अनेक फायदे आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की याचे नुकसान देखील होऊ शकते. जर तुम्ही सीताफळ जास्त प्रमाणात खाल्ले तर ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळे जर तुम्हाला सीताफळ खूप आवडत असेल तर ते खाण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे तोटे-
 
जास्त सीताफळ खाण्याचे तोटे
अनेकांना सीताफळाची अॅलर्जीही असू शकते. सीताफळ खाल्ल्यानंतर तुम्हाला खाज सुटण्याची किंवा पुरळ येण्याची समस्या येत असेल तर ते खाणे टाळा.
जर तुम्हाला पचनाशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही सीताफळ अजिबात खाऊ नये. कारण त्यात भरपूर फायबर असते. त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटदुखी, लूज मोशन, गॅस अशा समस्या उद्भवू शकतात.
सीताफळाची चव जितकी रुचकर असते तितकेच त्याच्या बियाही विषारी असतात. त्यामुळे याचे सेवन करताना नेहमी त्याच्या बियांची काळजी घ्या आणि खाण्यापूर्वी काढून टाका. कारण आरोग्याला अनेक हानी होऊ शकते.
सीताफळात लोह मुबलक प्रमाणात असते. पण जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर जास्त लोहामुळे उलट्या सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
 
अस्वीकरण: या लेखात दिलेल्या माहितीची आणि सूचनांची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

पांढरे केस लपवण्यासाठी केमिकल डायऐवजी कोणते नैसर्गिक पर्याय वापराल?

संत्र्याची साले फेकून देण्याऐवजी, घरीच शुद्ध आणि सुगंधी नैसर्गिक साबण बनवा; फायदे जाणून घ्या

तुम्हाला देखील मोबाईलवर प्रोफेशनल सेल्फी काढायचे का? मग या सोप्या ट्रिक नक्की वापरून पहा

इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांसाठी भरती; परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय निवड !

निवृत्तीनंतर शहरात राहणाऱ्या व्यक्तींनी तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी हे छंद जोपासले पाहिजेत

पुढील लेख
Show comments