Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोज माउथवॉशचा उपयोग केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो, जाणून घ्या

What happens if you use mouthwash daily
, बुधवार, 19 जून 2024 (07:50 IST)
रोज माउथवॉशचा उपयोग केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. काही तज्ञांच्या मते रोज माउथवॉशचा उपयोग तीन महिन्यांपर्यंत केल्यास दो प्रकारचे बॅक्टेरिया जन्म घेतात. ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.  माउथवॉशमध्ये उच्च अल्कोहल सामग्रीचे प्रमाण असते, जो या जीवघेण्या आजाराचे कारण बनते.
 
माउथवॉशचा उपयोग केल्याने इतर संक्रमणचा देखील धोका वाढतो. तसेच जेव्हा तुम्ही अल्कोहल युक्त माउथवॉशचा उपयोग करतात, तर तोंडात काही साईड इफेकट देखील होऊ शकतात. जसेकी तोंडात जळजळ होणे किंवा दुखणे.
 
माउथवॉशचा मुख्य उद्देश्य तोंडाची स्वछता करणे आणि ताजगी प्रदान करणे होय. माउथवॉश तोंडाची स्वच्छता तर करतो ज्यामुळे श्वास ताजा राहतो. पण हाच माउथवॉशचा तोंडात बॅक्टीरिया निर्माण करून कॅन्सरचा धोका निर्माण करतो.
 
माउथवॉश मधील उच्च अल्कोहल सामग्री तोंडाच्या पेशींना नुकसान करू शकते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अल्कोहल एक ज्ञात कार्सिनोजेन आहे, जे डीएनएला नुकसान पोहचवते आणि कॅन्सरच्या विकासाचे कारण बनते.
 
जर तुम्हाला माउथवॉशचा उपयोग करायचा असेल तर कमी अल्कोहल किंवा अल्कोहल नसलेला माउथवॉशचा वापरावा. याशिवाय माउथवॉशचा उपयोग सीमित करावा आणि आपल्या दंत चिकित्सिकांकडून सल्ला घ्यावा.  
 
माउथवॉशचा उपयोग तोंडाची स्वछता आणि ताजेपणा यासाठी उपयोगी आहे पण, पण जास्त उपयोग केल्यास तोंडासाठी घटक ठरू शकतो. याकरिता, माउथवॉशचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्विक आणि टेस्टी डिनरचा विचार करताय, तर ट्राय करा व्हेज पुलाव