कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर, आजूबाजूची स्वच्छता राखणे आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच लॉकडाऊन नंतर देखील आपल्याला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर आपण अश्या प्रकारच्या लोकांत आहात ज्यांनी आपल्या काम करणाऱ्या बायकांना किंवा नोकरांना येण्याची परवानगी दिली आहे तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
आपण घरात नोकरांना परत कामावर ठेवण्याचा विचार करत असाल तर हे लक्षात असू द्या की ते ज्या ठिकाणी राहतात किंवा ज्यांच्याकडे जातात त्यांच्या जवळ कोणी कोरोना संसर्गी तर नाही ?
त्यांना घरात येण्यापूर्वी त्यांचे हात पाय चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यास सांगा. त्यासाठी आपण घराच्या दारावरच पाण्याची बादली आणि हॅन्ड वॉश ठेवावे.
कामगारांना फेस मास्कचा वापर करण्यास सांगावे आणि जेव्हा ते आपल्या घरी येतील त्यांना एक नवे मास्क आणि ग्लव्स घालण्यास द्यावं.
घरात आल्यावर त्यांच्या चपला घराच्या बाहेरच काढायला लावाव्या. त्यांना घरात वापरण्यासाठी स्वच्छ चप्पल द्यावा. ते गेल्यावर त्या चपलेला देखील निर्जंतुक करावं.
जो पर्यंत काम करणारे घरात वावरत आहे तो पर्यंत त्यांनाच नव्हे तर घरातील प्रत्येक सदस्याला मास्क घालून ठेवायला पाहिजे.
कोणत्याही वस्तूंना स्पर्श करण्याआधी त्यांना आपले हात स्वच्छ करण्यास सांगावे.
त्यांच्यापासून सामाजिक अंतर राखा. जर आपल्याला सवय असेल त्यांच्या कामात मदतीची तर काही दिवस असं करू नका त्यांचा पासून अंतर राखणे आवश्यक आहे.
बाहेरून येणार्या या लोकांना घरातील वृद्ध आणि लहान मुलांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
वैयक्तिक स्वच्छतेकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं याची काळजी घ्यावी.
भांडे घासून झाल्यावर आपण वापरण्यापूर्वी त्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या, त्यानंतरच आपण त्या भांड्यांचा वापर करा.