Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही लक्षणे दुर्लक्ष करु नका, किडनीसंबंधी त्रास असू शकतो

symptoms
Webdunia
बुधवार, 7 जुलै 2021 (14:12 IST)
शरीरातील कोणत्याही समस्येकडे दुर्लक्षित करू नये कारण कदाचित ही समस्या एखाद्या आजाराचे कारण बनू शकतं. विशेषतः किडनीच्या बाबतीत तर सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे, कारण किडनीच्या आजाराचे सुरुवातीस लक्षात आले नाही तर ते प्राणघातक होऊ शकतं.
 
आकडेवारीत सिद्ध झाले आहे की या किडनीच्या किंवा मूत्रपिंडाच्या आजाराने सर्वात अधिक कोणी ग्रस्त आहे तर त्या बायका आहे. म्हणून त्यांना अधिक जागरूक आणि सावध राहण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊ या त्या संकेतांबद्दल, जे आपले शरीर आपल्याला किडनीचा आजार होण्याचं दर्शवतात.
 
* प्रत्येक वेळी कमकुवत पण जाणवणं.
* जास्त थकवा जाणवणं.
* शरीरात ऊर्जेचा अभाव. खरं तर जेव्हा मूत्रपिंड किंवा किडनी व्यवस्थितरीत्या काम करत नाही, तेव्हा माणसाचे शरीर या प्रकारचे संकेत देतात, ज्यांना वेळेत ओळखणे आवश्यक आहे.
* वारंवार लघवी लागणे.
* रात्री बऱ्याच वेळा लघवीला जाणं. जर आपल्याला देखील अश्याच प्रकारांची तक्रार असल्यास त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* जर आपल्याला एकाएकी आपली त्वचा रुक्ष वाटत असल्यास. त्वचेमध्ये जळजळ आणि खाज येत असल्यास याला सहजच घेऊ नका.
* शरीराचे वजन एकाएकी वाढणे.
* शरीरावर सूज येणं. हे आपली किडनी योग्य प्रकारे काम न करण्याचे संकेत देखील असू शकतात. अश्या परिस्थितीत आपल्याला त्वरितच डॉक्टरांचा सल्ला
घ्यावा.
* उन्हाळ्यात देखील जास्त थंडी वाजते.
* झोप येत नाही.
* अधिक तहान लागणे.
किडनीच्या या समस्या आढळल्यास दुर्लक्षित करू नका, नाही तर मग पुढे जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळा येऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

थायरॉईडचा लैंगिक इच्छांवर परिणाम होतो का? काय काळजी घ्यावी

Sweet Recipe Mango Kheer झटपट बनवा आंब्याची खीर

Shivrajyabhishek Din 2025 Wishes in Marathi शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

अचानक पोटदुखीवर हे घरगुती उपाय अवलंबवा

६ जून १६७४ शिवराज्याभिषेक दिन; शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण माहिती

पुढील लेख
Show comments