Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने आश्चर्यकारक फायदे होतात, वजन कमी होण्यास मदत होईल

Soaked Black Raisins Benefits
, शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (10:36 IST)
मुनक्का आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात याचे सेवन अधिक केले जाते कारण ते प्रकृतीने गरम आहेत. तथापि आपण ते उन्हाळ्यात देखील खाऊ शकता. पण यासाठी मनुका रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्या. आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन कराव्यात. भिजवलेल्या मनुका खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आज आपण भिजवलेल्या मनुकाचे फायदे आणि जास्त खाण्याचे तोटे जाणून घ्या-
 
वजन कमी करण्यास उपयुक्त- रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यात आढळणारे ग्लुकोज आणि फ्रक्टोज घेतल्याने वजन नियंत्रणात राहते. रोज सकाळी मनुका खाल्ल्यास लठ्ठपणाचा बळी होण्यापासून वाचता येतं.
 
डोळ्यांसाठी फायदेशीर - भिजवलेल्या मनुका खाण्याने डोळ्यांची कमजोरी दूर होते. मुनकांमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे डोळ्यांच्या समस्या, मोतीबिंदू आणि कमी होत असलेल्या दृष्टीपासून मुक्ती मिळते. अशात मनुका नियमित खाल्ल्यास डोळे निरोगी राहू शकता.
 
केसांसाठी फायदेशीर- नियमितपणे भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने केस गळण्याची समस्या कमी होते. यामध्ये असलेले आयरन आणि व्हिटॅमिन सी केसांच्या चमक आणि मजबुतीसाठी काम करतात. त्यामुळे केस दाट होतात आणि कोंडा आणि टाळूशी संबंधित समस्या दूर होतात.
 
दातांची समस्या दूर होते- यात फायटोकेमिकल असल्याने सर्व प्रकारच्या दातांची समस्या दूर होते. सकाळी रिकाम्या पोटी मनुका खाल्ल्याने तोंडातील बॅक्टेरिया देखील नष्ट होतात.
 
बद्धकोष्ठतेपासून सुटका- यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. मनुका पोटातील पाणी शोषून घेतात ज्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यात फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असल्याने पचनसंस्था मजबूत होते. याशिवाय गॅसची समस्या आणि मूत्रमार्गात अडथळे येण्याची समस्याही दूर होते.
 
जास्त प्रमाणात मनुका खाण्याचे तोटे
कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन हानिकारक ठरु शकतं. अशात जास्त प्रमाणात मनुका खाल्ल्याने नुकसान होऊ शकतं. यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकतं. जास्त मनुका खाल्ल्याने वजन वाढू शकतंं, जुलाब, उलट्या, ताप, फॅटी लिव्हर, साखर, तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील वाढू शकतो. त्यामुळे जास्त प्रमाणात मनुका खाणे टाळावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्नदान करताना कोणाशीही भेदभाव करू नका, सर्वांची भूक सारखीच असते