सध्याचा काळात देशाची स्थिती बघून कोरोनाच्या दुष्प्रभावाखाली आपण घरातच बंद आहोत.
लॉकडाऊन च्या काळात आपण आपले वेळ आपल्या परिवार सोबत आनंदात घालवत आहोत. परिवाराच्या बरोबरच आम्ही स्वतःची सुद्धा काळजी घेत आहोत. त्या साठी स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी शरीराला व्यायाम करणे आवश्यक आहे.
आपल्यापैकी काही जणांना असे वाटते की आपण घराचे काम तर करत आहोत मग ते आपल्या शरीराला पुरेसे आहे. त्यामधेच आपले बरेच व्यायाम होतातच. आम्हाला अजून व्यायाम करण्याची काय गरज. बहुतांश लोक म्हणतात की आम्ही घराची कामे करतो त्यामध्येच आमचे भरपूर व्यायाम होऊन जाते. तेवढे आमच्या शरीराला निरोगी ठेवण्यास पुरेसे आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये किती तथ्य आहे जाणून घेऊ या.
घराच्या कामामुळे खरंच व्यायाम होत असतो का? त्या मुळे आपले शरीर तजेल आणि निरोगी राहते का? या सर्व प्रश्नांचे उत्तर आणि या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला.
फिटनेस तज्ज्ञ अंकुर सिंग यांचा मतानुसार केवळ घरातील काम केल्याने व्यायाम होतं असे वाटणे योग्य नाही. घराचे काम केल्याने आपण तंदुरुस्त तर राहता परंतू घराला नीट नेटके सांभाळण्याच्या व्यतिरिक्त आपल्याला स्वतःला देखील सांभाळायचे आहेत. त्यासाठी आपल्याला कमीत कमीत स्वतःसाठी अर्धा तास तरी काढणे गरजेचे आहे. तेव्हाच आपणं तंदुरुस्त आणि फिट राहाल.
ते म्हणतात की सध्याचा लॉकडाऊनच्या परिस्थतीमुळे आपणं सर्व आपापल्या घरातच आहोत. अश्या वेळी आपल्याला शारीरिक आणि मानसिक रीत्या स्वस्थ राहणे गरजेचे आहे. या साठी आपल्याला फक्त आपल्या घर कामात नव्हे तर आपल्याला निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे.
त्यामध्ये आपल्याला योग आणि प्राणायाम फायदेशीर ठरतो. ह्याच बरोबर तरल द्रव्य आणि भरपूर पाणी पिणं आपल्या तब्येतीसाठी चांगले असते. आपण आपल्या मनातून हे काढायला हवे की फक्त घर कामे करून आपणं फिट राहू शकतो.
असा ही विचार करू नका की आपल्याला सध्या जिमला जाणे शक्य नाही आणि जाताही येत नाही त्यामुळे आपले व्यायाम तर होतं नाही तर घरात काय करता येईल. असे काही नाही की व्यायाम आपण फक्त जिम मध्ये गेल्यावरच करू शकता. आपणं घरात राहून सुद्धा फक्त अर्धा तास देऊन योग, प्राणायाम, तसेच प्लॅन्क, पुशअप, जम्पिंग जॅक्स, सीटअप्स सुद्धा करू शकता. हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे.
ह्याच बरोबर दररोज प्राणायाम करावे. मेडिटेशन (ध्यान) चा आपल्या दैनंदिनी मध्ये समावेश करावा. जेणे करून आपले शरीर आणि मेंदू दोन्ही निरोगी राहतील. ,