Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवसभर सक्रिय राहण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Let's find out. Some health tips. in marathi
, शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (10:00 IST)
आपणास अतिरिक्त वजन कमी करायचे असल्यास आणि संपूर्ण दिवस सक्रिय राहायचे असल्यास या टिप्स अवलंबवा. वास्तविक आपण आहाराशी निगडित लहान गोष्टींकडे लक्ष देण्यास असमर्थ असतो आणि अशा बऱ्याच गोष्टी खातो जे आपल्या आरोग्याला फायदेशीर नसतात. काही गोष्टींकडे लक्ष दिल्यानं आरोग्याच्या तक्रारी होत नाही. चला तर मग जाणून घेऊ या. काही आरोग्य टिप्स.
 
1 दररोज भरपूर पाणी प्या, आणि कॅलरी मुक्त गोष्टींचे सेवन करा.
 
2 सकाळी न्याहारी घ्या. न्याहारी न घेतल्यानं अनेक आजार होऊ शकतात.
 
3 रात्री स्नॅक्स घेताना जपूनच खा.
 
4 दिवसभर काही तरी खाणे सुरु ठेवा, जेवणात बराच अंतर असू नये.
5 आहारात प्रथिने समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा.
 
6 आहारात गरिष्ठ आणि मसालेदार पदार्थ नसावे.
 
7 खाण्यात लाल, हिरव्या, संत्री रंगाचे पदार्थ आवर्जून घ्या. या तीन रंगांच्या नियमाचे अनुसरण करा आणि खाद्यपदार्थां मध्ये गाजर, संत्री आणि हिरव्या भाज्या समाविष्ट करा.
 
8 वजन कमी करण्यासाठी जेवणात मीठ कमी करा.
 
9 वजन कमी करायचे असल्यास दर रोज जेवण्याच्या पूर्वी कमी कॅलरी असलेले व्हेजिटेबल सूप घ्यावं, या मुळे 20 टक्के कॅलरी कमी खर्च होईल आणि पोट देखील भरलेले राहील.
 
10 कॅलरीची संख्या वगळून पोषक घटक असलेला आहार घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोप्या किचन टिप्स अवलंबवा आयुष्य सोपे बनवा