suvichar

चहासोबत हे पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक

Webdunia
गुरूवार, 16 जुलै 2026 (18:13 IST)
आपल्याकडे चहाप्रेमींची संख्या अथांग आहे. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळच्या थकव्यापर्यंत चहाचा एक घोट घ्यायला सर्वांनाच आवडतो. चहासोबत भजी, बिस्किटे किंवा काहीतरी चटपटीत खाणे हा तर अनेकांचा रोजचा नियम असतो.पण तुम्हाला माहिती आहे का? आयुर्वेदानुसार आणि आधुनिक विज्ञानानुसार, चहासोबत काही विशिष्ट पदार्थ खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. या चुकीच्या संयोजनामुळे  पोटाचे विकार, ॲसिडिटी आणि त्वचाविकार उद्भवू शकतात. आज आपण चहासोबत चुकूनही खाऊ नयेत असे पदार्थ पाहणार आहोत 
 
चहासोबत टाळायचे मुख्य पदार्थ
१. बेसन किंवा तळलेले पदार्थ (भजी, समोसे, शेव):
पाऊस पडू लागला की चहा-भजीचे समीकरण ठरलेले असते. मात्र, बेसन आणि चहाचे हे कॉम्बिनेशन पचनसंस्थेसाठी अत्यंत घातक आहे. बेसनामुळे चहातील पोषक घटक शरीरात शोषले जात नाहीत. यामुळे अपचन, गॅसेस, पोट फुगणे आणि तीव्र ॲसिडिटी होऊ शकते.
 
२. लिंबू किंवा आंबट पदार्थ :
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी किंवा चवीसाठी 'लेमन टी' पितात. परंतु, चहाच्या पानात असणारे घटक आणि लिंबाचा रस एकत्र आल्यास पोटात जास्त प्रमाणात ॲसिड तयार होते. यामुळे छातीत जळजळ, उलट्या होणे किंवा गॅस्ट्रिक समस्या उद्भवू शकतात.
 
३. हळद असलेले पदार्थ:
हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात, पण चहा आणि हळद यांचे अजिबात पटत नाही. चहाच्या पानांमधील रासायनिक घटक आणि हळदीतील 'कर्करोग प्रतिबंधक' घटक  एकत्र आल्यास रासायनिक प्रक्रिया होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात. 
 
४. थंड पदार्थ : 
गरमागरम चहा पिण्यापूर्वी किंवा प्यायल्यानंतर लगेचच थंड पाणी, आईस्क्रीम किंवा कोणतेही थंड पेय पिणे टाळावे. तापमानातील या अचानक बदलामुळे पचनक्रिया मंदावते आणि दात संवेदनशील होतात. तसेच यामुळे घशाचे संसर्ग आणि सर्दी-खोकला होऊ शकतो.  
 
५. हिरव्या पालेभाज्या आणि लोहयुक्त अन्न : 
चहामध्ये 'टॅनिन्स' आणि 'ऑक्सलेट्स' नावाचे घटक असतात. जेव्हा तुम्ही चहासोबत लोहयुक्त पदार्थ जसे की सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या किंवा मोड आलेली कडधान्ये खाता, तेव्हा चहातील घटक शरीराला हे लोह शोषून घेण्यापासून रोखतात. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासू शकते.
ALSO READ: रोज चहा पिणाऱ्यांनी ही माहिती एकदा नक्की वाचा; तज्ज्ञांनी दिला इशारा
महत्त्वाचा सल्ला: चहा पिण्यापूर्वी आणि नंतर किमान ३० ते ४० मिनिटांचे अंतर राखूनच इतर पदार्थांचे सेवन करावे. रिकाम्या पोटी कडक चहा पिण्याऐवजी आधी एक ग्लास कोमट पाणी पिणे नेहमीच फायदेशीर ठरते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता? सावधान, शरीरात होऊ शकतात 'हे' ४ गंभीर बदल
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: जेवणानंतर लगेच चहा पिणे ही एक गंभीर समस्या असू शकते; तोटे जाणून घ्या…

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

कमी तेलात आणि बाहेरून कुरकुरीत! आषाढी एकादशीला बनवा हॉटेलसारखा परफेक्ट 'साबुदाणा वडा'; टिप करा नोट

कानांच्या काळजीसाठी ऑलिव्ह तेल का आणि कसे फायदेशीर आहे, फायदे जाणून घ्या

Career Tips: बीटेक इन पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता,व्याप्ती ,पगार जाणून घ्या

Homemade remedies: डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी सर्वात सोपा घरगुती उपाय, नक्की करून पहा

गुलाबाच्या पाकळ्या वापरून घरीच नैसर्गिक लिप बाम बनवा; ओठ अगदी मऊ राहतील

पुढील लेख