Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जेवण झाल्या-झाल्या टॉयलेट जावं लागत असल्यास हा उपाय करून बघा

जेवण झाल्या-झाल्या टॉयलेट जावं लागत असल्यास हा उपाय करून बघा
, बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (13:09 IST)
विचार करा ! जर आपण एखाद्या समारंभात गेला आहात. तिथे सर्व पदार्थ आपल्या आवडीचे आहे. पण आपण हे खाण्यास घाबरतं आहात. कारण आपल्याला खाल्ल्यावर लगेचच शौच जावं लागतं. कल्पनेच्या व्यतिरिक्त जे लोक या त्रासाला अनुभवत आहे किंवा सोसत आहे त्यांच्यासाठी हे सत्य अनुभवणे फार भयावय आहे. 
 
हा त्रास अधिक गंभीर तेव्हा होतो जेव्हा खाल्ल्यावर टॉयलेटला जाण्यामुळे आपले वजन कमी होतं. बऱ्याच वेळा टॉयलेटला जाण्यामुळे काही लोक जेवणच कमी करतात. म्हणून आज आम्ही आपल्याला सांगत आहोत यावर काही उपाय, जे अवलंबवल्याने आपल्याला या त्रासापासून मुक्ती मिळू शकते. सर्वप्रथम समस्येला जाणून घेऊ या.
 
गॅस्ट्रो कॉलिक रिफलक्स - जेवण झाल्यावर लगेचच शौचास किंवा टॉयलेटला जाण्याच्या त्रासाला गॅस्ट्रो-कॉलिक रिफलक्स म्हणतात. असे दिसून आले आहे की हा त्रास त्यांना जास्त होतो ज्यांना बऱ्याच काळ टॉयलेट किंवा शौचास रोखण्याची सवय असते.
 
हे उपाय अवलंबवा  - 
* चावून चावून खाणे.
* फायबर असलेले पदार्थ सेवन करावे.
* 3 -4 वेळा थोडं-थोडं अन्न खा.
 
आहारात हे पदार्थ समाविष्ट करा - 
या त्रासापासून वाचण्यासाठी फायबर असलेले पदार्थांचा समावेश करावा. फायबर असलेले पदार्थांमध्ये नाशपती, सफरचंद, वाटाणे, ब्रोकोली, शाबूत धान्य, शेंगा आणि डाळी आहे. तसेच आहारात दही, कच्चं सॅलड किंवा कोशिंबीर, आलं, अननस, पेरू, ओवा इत्यादी समाविष्ट करणे. या शिवाय केळी, आंबे, पालक, टमाटे, शेंगदाणे, शतावरी. या आहारात पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतं, म्हणून हे आहार देखील फायदेशीर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NSD Recruitment 2020 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये लिपिक, MTS सह अनेक पदांवर भरती