Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

या वस्तूंबरोबर औषध घेत असाल तर सावध व्हा....

या वस्तूंबरोबर औषध घेत असाल तर सावध व्हा....
सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेक लोकं प्रत्येक दिवस कोणत्या न कोणत्या औषध गोळ्या घेत असतात. मग मधुमेह, बीपी असो वा साधारण सर्दी-खोकला. त्यातून अनेक लोकं लवकर बरे होण्यासाठी औषधांसोबत दूध, ज्यूस, चहा- कॉफी पितात. पण काय आपल्या माहीत आहे की अनेक असे औषधं आहे ज्यासोबत चुकीच्या वस्तू सेवन केल्याने औषधांचा प्रभाव नाहीसा होतो आणि आरोग्यावर विपरित परिणाम होतो. म्हणूनच पाहू या कोणते खाण्या-पिण्याचे पदार्थ कोणत्या औषधांबरोबर घेणे टाळावे:

केळी: केळीसोबत ब्लड प्रेशरचे औषधं घेणं नुकसान करू शकतं. केळीत पोटॅशियमची मात्रा अधिक असल्यामुळे हृदय दर आणि अस्वस्थता वाढते. म्हणूनच बीपीच्या औषधांबरोबर केळी खाणे टाळावे. 

दारू: जर आपण मधुमेह, पेनकिलर किंवा अँटीहिस्टामिन औषध घेत असाल तर दारू पिणे टाळा. दारूने लिव्हरवर दबाव येतो ज्याने औषधं गळण्यात समस्या येते. यामुळे लिव्हरला खूप मेहनत घ्यावी लागते ज्याने लिव्हरला नुकसान होऊ शकतं.
webdunia

ज्येष्ठमध: हार्टसाठी घेत असलेल्या औषधांबरोबर ज्येष्ठमधाचे सेवन टाळावे. याची जड शरीरात पोटॅशियमची मात्रा कमी करते जे हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. कमी पोटॅशियममुळे हार्ट फेलियर होण्याची शक्यता असते आणि हृदय गती असामान्य होते.
webdunia

पालेभाज्या: जर आपण अॅटीकोअगुलांट्स अर्थात रक्ताला पातळ करण्याचे औषध घेत असाल तर हिरव्या पालेभाज्या सेवन करणे टाळा. कारण यात विटामिन के असतं ज्याने ब्लड साठतं. जर आपण औषध घेण्याच्या लगेच नंतर पालेभाज्या खात असाल तर औषधाचा प्रभाव होणार नाही.
webdunia

विटामिन सी आढळणारे पदार्थ:  कफ सिरप घेत असल्यास विटामिन सी आढळणारे पदार्थ घेणे टाळा. कारण या सिरपबरोबर संतर्‍याचा ज्यूस सेवन केल्याने चक्कर येणे किंवा विसर पडणे अश्या काही समस्या उद्भवू शकतात.फळांचा प्रभाव 24 तास असतो म्हणून कफ सिरपबरोबर लिंबू किंवा संत्रे खाणे टाळा.
webdunia

दूध: जर आपण अँटीबायोटिक औषधं घेत असाल तर दूध पिणे योग्य नाही. दुधामुळे हे औषधं शरीरात विरघळत नाही आणि याचे साइड इफेक्ट झेलावे लागतात. म्हणून हे औषधं जेवण्याच्या एका तासाआधी किंवा जेवण्याच्या दोन तासानंतर पाण्याने घ्यायला हवे. 
webdunia

कॉफी: दम्याचे औषध घेत असलेल्यांनी कॉफी पिणे टाळावे. कारण औषधांबरोबर कॉफी पिण्याने अस्वस्थता वाटते आणि हार्टबिट्‌स वाढतात.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या पाली हसतात ! (Laughing lizard video)